नागपाडा येथून तीन महिलांसह पाच बांगलादेशी नागरिकांना अटक

बांगलादेशींना लॉजिस्टिक मदत करणार्‍या भारतीय नागरिक ताब्यात

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ जानेवारी २०२५
मुंबई, – नागपाडा येथून तीन महिलांसह पाच बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या बांगलादेशी नागरिकांना लॉजिस्टिक मदत करणार्‍या एका भारतीय नागरिकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अटकेनंतर सहाजणांना किल्ला कोर्टाने २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. महादेव जीवलाल यादव, बिस्टी जलाल फकीर समफुल शेख, बिस्टी असुल अलीम अख्तर गुलाम, उर्मिला अख्तर मुल्ला खातून व अन्य दोन पुरुष बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. यातील महादेव याने पाचही बांगलादेशी नागरिकांना लॉजिस्टिक मदत करुन त्यांना भारतीय नागरिक असल्याचे बोगस आधारकार्ड बनवून दिले होते. या आधारकार्डवरुन तिन्ही बांगलादेशी महिलांनी राज्य शासनाच्या बहुचर्चित लाडकी बहिण योजनेचा फायदा घेतला होता, मात्र तपासात ही बाब उघडकीस आली नसल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांनी सांगितले.

मुंबई शहरात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मुंबई पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना नागपाडा परिसरात काही बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्याासाठी पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मिलिंद काठे, पोलीस निरीक्षक समीर लोणकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश देशमुख, कामुनी, पोलीस हवालदार बंगाळे, राजेश पाटील महिला पोलीस शिपाई गायकर व अन्य पोलीस पथकाने नागपाडा परिसरात संबंधित बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना नागपाडा येथील नववी गल्ली, बंगला क्रमांक ३०८ परिसरातून पोलिसांनी महादेव यादव याच्यासह बिस्टी जलाल शेख, बिस्टी असुल गुलाम आणि उर्मिला खातून तीन महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या तिन्ही महिलांची चौकशी केली असता त्या बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले.

बांगलादेशातील गरीबीसह उपासमारीला कंटाळून त्या तिघीही भारतात पळून आल्या होत्या. तेव्हापासून त्या मुंबई शहरात नोकरीनिमित्त राहत होत्या. त्यांच्याकडून पोलिसांनी सात मोबाईल, दोन आधारकार्ड त्यांच्या चौकशीतून इतर दोन बांगलादेशी नागरिकांचे नाव समोर आले होते. त्यांनतर या पथकाने दोन पुरुष बांगलादेशी नागरिकांना अटक केली. त्यांच्याविरुद्घ भारतीय न्याय सहिता, विदेशी व्यक्ती अधिनियम, पारपत्र, परकीय नागरिक कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच कारवाईत पोलिसांनी अन्य पाच महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र पाचजणी भारतीय नागरिक असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले होते.

तपासात महादेव यादव हा भारतीय नागरिक असून तो बांगलादेशी नागरिकांना लॉजिस्टिक मदत करत असल्याचे उघडकीस आले. त्याने अटकेत असलेल्या बांगलादेशी नागरिकांना बोगस दस्तावेज सादर करुन आधारकार्ड मिळवून दिले होते. बिस्टी जलाल आणि बिस्टी असुल या दोन्ही महिलांना त्यानेच आधारकार्ड दिले होते. याच आधारकार्डवरुन त्यांनी लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरुन त्याचा लाभ घेतला होता. मात्र या वृृत्ताचे खंडन केले आहे. आतापर्यंतच्या तपासात ही बाब उघडकीस आली नाही. आरोपीच्या वकिलांनी कोर्टात ही माहिती सांगितल्याचे बोलले जाते. मात्र पोलीस तपासात या तिन्ही महिलांना अशा प्रकारे कुठल्याही योजनेचा लाभ घेतला नसल्याचे उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page