कॅश क्रेडिट घेऊन बँकेची ४० लाखांची फसवणुक

बँकेच्या दोन अधिकार्‍यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ जानेवारी २०२५
मुंबई, – फ्लॅटचे बोगस दस्तावेज सादर करुन बँकेकडून घेतलेल्या सुमारे ४० लाखांच्या कॅश क्रेडिट लोनचा अपहार करुन फसवणुक झाल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँकेकडून आलेल्या तक्रार अर्जानंतर दादर पोलिसांनी तिघांविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन पैशांचा अपहार करुन बँकेची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हिमेक दाबे, अशोक गोयल आणि अखिलेखचंद्र शुक्ला अशी या तिघांची नावे असून यातील हिमेक हा मुख्य आरोपी तर इतर दोघेजण बँकेचे अधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुरेखा दिपक शिंदे या घाटकोपर येथील पंतनगर, गौरीशंकरवाडी विशाल शिल्प अपार्टमेंटमध्ये राहतात. त्या स्टेट बँक ऑफ पतियालामध्ये कामाला असून त्यांची नेमणूक सध्या दादर येथील शाखेत मॅनेजर म्हणून आहे. मार्च २००८ साल त्यांच्या बँकेतून हिमेश दाबे यांनी ४० लाखांचे कॅश क्रेडिट घेतले होते. ही रक्कम त्याने कांदिवलीतील चारकोप, प्लॉट क्रमांक १९८, चारकोप-श्रुती सहकारी सोसायटीमध्ये एक फ्लॅटसाठी घेतले होते. त्यात त्याने फ्लॅटचे सर्व दस्तावेज, अग्रीमेंट, मुद्रांक पेपर, दुय्यम निबंधक अधिकार्‍यांच्या सही आणि शिक्के असे सर्व दस्तावेज सादर केले होते. ते दस्तावेज गहाण ठेवल्यानंतर त्यांना बँकेकडून ४० लाखांचे कॅश क्रेडिट कर्ज मंजूर करण्यात आले होते. मात्र बँकेने दिलेल्या कर्जाचे हप्ते त्यांनी भरले नाही. याबाबत नोटीस बजावूनही त्याने नोटीसाला उत्तर दिले नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची बँकेकडून चौकशी करण्यात आली होती. त्यात हिमेश दाबे यांनी बँकेत सादर केलेले सर्व दस्तावेज बोगस होते. बॅकेच्या वकिलांनी सबरजिस्ट्रार कार्यालयातून संबंधित कागदपत्रांची मागणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.

फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर बँकेकडून टाईटल प्रॉपटीबाबत शहानिशा करण्यात आली होती. त्यासाठी बँकेच्या वतीने अखिलेशचंद्र शुक्ला यांना पाठविण्यात आले होते. त्यांच्या रिपोर्टनंतर बँकेचे अधिकाी अशोक गोयल यांनी कॅश क्रेडिटला मंजुरी दिली होती. त्यामुळे बँकेच्या या दोन्ही अधिकार्‍यांची कामगिरी संशयास्पद दिसून आली होती. चौकशी अधिकार्‍यांनी त्यांचा अहवाल बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सादर केला होता. त्यात हिमेश दाबे याने बँकेची फसवणुक करण्याच्या उद्देशाने बोगस दस्तावेज सादर करुन बँकेकडून ४० लाखांचे कॅश क्रेडिट लोन घेऊन फसवणुक केली होती. तसेच बँकेच्या दोन्ही अधिकार्‍यांनी त्यांच्यात कामात कसून केल्याचा ठपका ठेवला होता. त्यामुळे बँकेच्या वतीने सुरेखा शिंदे यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी हिमेक दाबे, अशोक गोयल आणि अखिलेखचंद्र शुक्ला या तिघांविरुद्ध ४२०, ४६५, ४६७, १२० बी, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या तिन्ही आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यासाठी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page