मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ जानेवारी २०२५
मुंबई, – विदेशातून आलेल्या ड्रग्ज आणि गोल्ड तसेच विदेशात विदेशी चलनाच्या तस्करीचा सीमा शुल्क विभागाने पर्दाफाश करुन चार प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. या प्रवाशांकडून ७ कोटी ५१ लाखांचे ड्रग्ज, ८६ लाख ६८ हजार रुपयांचे गोल्ड तर २२ लाख ४० हजार रुपयांचा विदेशी चलन असा सुमारे साडेआठ कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चारही प्रवाशांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
गेल्या काही वर्षांत गोल्ड, ड्रग्ज आणि विदेशी चलनाच्या तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याने अशा तस्कराविरुद्ध सीमा शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. शुक्रवार २४ जानेवारी आणि २५ जानेवारीला सलग दोन दिवस या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. यावेळी विदेशातून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची तपासणी केली जात होती. ही मोहीम सुरु असातना एक प्रवाशी टांझानिया येथून आला होता. तो विमानतळाबाहेर जाण्याच्या तयारीत असतानाच या अधिकार्यांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे या अधिकार्यांनी ५५ हून अधिक कॅप्सुल सापडले. या कॅप्सुलमधून तो ड्रग्ज घेऊन आले होते. या कॅप्सुलमधून या अधिकार्यांनी ७ किलो ५१० ग्रम वजनाचे ड्रग्ज जप्त केले असून आंतरराष्ट्रीय बाजारात याच ड्रग्जची किंमत साडेसात कोटी रुपये इतकी आहे. याच गुन्ह्यांत नंतर या प्रवाशाला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दुसर्या कारवाईत या अधिकार्यांनी सोने तस्करीचा पर्दाफाश केला. जेद्दाहहून दोन प्रवाशी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. यावेळी त्यांनी शरीरातील पोकळीसह शूजमधून गोल्ड आणले होते. या दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंगझडतीत या अधिकार्यांना ८६ लाख ६८ हजार रुपयांचे गोल्ड सापडले. गोल्ड तस्करीप्रकरणी या दोघांनाही नंतर या अधिकार्यांनी अटक केली. तिसर्या घटनेत दुबईला जाणार्या एका प्रवाशाला या अधिकार्यांनी अटक केली. त्याच्याकडून या अधिकार्यांनी एक लाख सौदी रियाल म्हणजे २२ लाख ४० लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त केले आहे. ते सौदी रियाल घेऊन तो दुबईला जात होता, मात्र त्यापूर्वीच त्याला सीमा शुल्क विभागाने अटक केली. या तिन्ही कारवाईत या अधिकार्यांनी ड्रग्जसहीत सोने आणि विदेशी चलन असा ८ कोटी ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.