चार अल्पवयीन मुलांशी अश्‍लील चाळे करुन अत्याचार

२४ वर्षांच्या तरुणाला अटक तर दोघांचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ जानेवारी २०२५
मुंबई, – गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात पंधरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांना हुक्का पिण्यास प्रवृत्त करुन त्यांच्याच अंकलने दोघांवर अश्‍लील चाळे तर मालाड व मालवणी येथे अकरा आणि पाच वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलावर त्याच्याच परिचित आरोपींनी अनैसगिंक लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर मालवणी आणि मालाड पोलिसांनी तीन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. याच गुन्ह्यांत एका २४ वर्षांच्या आरोपी तरुणाला मालाड पोलिसांनी अटक केली तर पळून गेलेल्या अंकलसह दुसर्‍या आरोपीचा मालवणी व शिवाजीनगर पोलिसांकडून शोध सुरु आहे.

बळीत पंधरा वर्षांचा मुलगा हा कुर्ला येथे राहतो. आरोपी हा त्यांचा अंकल असून तो गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहतो. १ डिसेंबर ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत त्याने बळीत मुलगा व त्याचा पंधरा वर्षांचा मित्राला त्याच्या घरी आणले होते. तिथे त्यांना जबदस्तीने हुक्का पिण्यास प्रवृत्त केले. हुक्का प्यायल्यानंतर तो दोन्ही अल्पवयीन मुलांशी अश्‍लील चाळे करत होता. त्यांच्या अंगावरील कपडे काढत होता. हा प्रकार या दोघांच्या नंतर लक्षात आले होते. त्यानंतर त्याने दोघांनाही हा प्रकार कोणालाही सांगू नका अशी धमकी दिली होती. भीतीपोटी त्यांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र त्याच्याकडून वारंवार असेच प्रकार घडण्याची शक्यता असल्याने बळीत मुलाने हा प्रकार त्याच्या आई-वडिलांना सांगितला. या माहितीनंतर दोन्ही मुलांना घेऊन ते शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आले होते. तिथे घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन पोलिसांनी पळून गेलेल्या अंकलचा शोध सुरु केला आहे. तीन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

दुसरी घटना मालाड परिसरात घडली. ३५ वर्षांचे तक्रारदार शिक्षक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहतात. त्यांना अकरा वर्षांचा मुलगा असून तो एका खाजगी शाळेत शिकतो. गुरुवारी रात्री साडेआठ वाजता तो घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. यावेळी याच इमारतीत राहणारा २४ वर्षांचा आरोपी तरुण तिथे आला. त्याने बळीत मुलाला त्याचे नाव, गाव आणि घराची माहिती विचारली होती. त्याला तू माझ्या भाच्यासारखा आहे असे सांगून त्याची पॅण्ट काढून त्याच्याशी अश्‍लील चाळे करुन अनैसगिेक लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर या मुलाने त्याच्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. ही माहिती ऐकून त्यांना धक्काच बसला होता. त्यांनतर त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगून आरोपी तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी अनैसगिक लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली. बळीत आणि आरोपी एकाच परिसरात राहणारे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तिसरी घटना मालाडच्या मालवणी परिसरात घडली. याच परिसरात पाच वर्षांचा मुलगा त्याच्या पालकांसोबत राहतो. याच परिसरात आरोपी राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहे. शुक्रवारी बळीत मुलगा घरासमोरच खेळत गेला होता. काही वेळाने त्याची आई त्याला बोलाविण्यासाठी बाहेर आली. मात्र तो कुठेच दिसला नाही. सर्वत्र शोध घेऊन तो सापडला नाही. याच दरम्यान त्याला आरोपीने घराजवळ सोडल्याचे तिच्या मुलीने सांगितले. घरी आल्यानंतर तिने त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने आरोपी त्याला जंगलात घेऊन गेला होता. तिथे त्याने त्याला पैसे देतो असे सांगून त्याच्याशी अनैसगिंक लैगिंक अत्याचार केल्याचे सांगितले. ही माहिती ऐकल्यानंतर तिला धक्काच बसला होता. त्यानंतर तिने आरोपीविरुद्ध मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी तेथून पळून गेला होता. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page