बोगस धनादेश बँकेत जमा करुन महाराष्ट्र पर्यटन विभागाची फसवणुक
६८ लाखांचा अपहारप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ मार्च २०२४
मुंबई, – पंधराहून अधिक बोगस धनादेश बँकेत जमा करुन महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या बँक खात्यातून अज्ञात व्यक्तींनी सुमारे ६८ लाखांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मरिनड्राईव्ह पोलिसांनी चौघांविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. आकाश डे, तपन मंडल, लक्ष्मी पाल आणि आनंद मंडल अशी या चौघांची नावे असून ते चौघेही मूळचे कोलकाताचे रहिवाशी आहे. ही रक्कम संबंधित चौघांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली असून या बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांचा मरिनड्राईव्ह पोलिसांनी गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विभागाचे नरिमन पॉईट येथील एका खाजगी बँकेत अकाऊंट आहे. १३ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत या बँकेत बोगस धनादेश सादर करुन पर्यटन विभागाच्या खात्यातून सुमारे ६८ लाख रुपये चार वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाले होते. त्यासाठी अज्ञात व्यक्तींनी पंधराहून अधिक धनादेशासह शिक्क्यांचा वापर केला होता. बँक खात्यातून काही अनधिकृत व्यवहार झाल्याचे निष्पन्न होताच त्याची वरिष्ठ अधिकार्यांकडून शहानिशा सुरु होती. तपासादरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर मुख्य मुख्या लेखाधिकाी विठ्ठल सुडे यांनी मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी तोतयागिरी करुन बोगस धनादेश सादर करुन ६८ लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
या गुन्ह्यांचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. प्राथमिक तपासात ही रक्कम कोलकाता येथील रहिवाशी असलेल्या आकाश डे, तपन मंडल, लक्ष्मी पाल आणि आनंद मंडल यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे उघडकीस आले आहे. आकाशच्या बँक खात्यात २२ लाख ७९ हजार, तपनच्या बँक खात्यात २२ लाख ७३ हजार, लक्ष्मीच्या बँक खात्यात १३ हजार ९१ हजार तर आनंदच्या बँक खात्यात ९ लाख २४ हजार रुपये जमा झाले होते. अशा प्रकारे या चौघांच्या खात्यात ६८ लाख ६७ हजार रुपये जमा झाले आहे. ही रक्कम नंतर वेगवेगळ्या खात्यात ट्रान्स्फर करुन ती एटीएमच्या माध्यमातून काढण्यात आली होती.
फसवणुकीसाठी अज्ञात व्यक्तींनी पंधराहून अधिक बोगस धनादेशचा वापर केल्याचे तपासात उघड झाले आहे. गुन्ह्यांचा तपासकामी मरिनड्राईव्ह पोलिसांची एक टिम लवकरच कोलकाता येथे जाणार आहे. या चारही बँक खातेदारांची जास्तीत जास्त माहिती मिळविण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.