राजू परुळेकर
३० जानेवारी २०२५
मुंबई, (प्रतिनिधी) – धारावीकरांचे पुनर्वसन आम्ही मुलुंडमध्ये होऊ देणार नाही, धारावीकरांना त्यांच्याच ठिकाणी घरे देण्यात यावी अशी ामगणी ईशान्य मुंबईचे शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी केली.
धारावीकरांच्या पुनर्वसनाचा विरोध करण्यासाठी आज मुलुंडकर एकवटले होते, खासदार संजय दिना पाटील, शिवसेनेचे विक्रोळीचे आमदार सुनील राऊत, उपनेते दत्ता दळवी, सुरेश पाटील तसेच शिवसेनेचे माजी आमदार रमेश कोरगावकर, युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील व हजारो शिवसैनिक तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
शिवसेना शाखा क्रमांक 105 मुलुंड पूर्व येथून या मोर्चाला सुरुवात झाली. मुलुंड पूर्व रेल्वे स्टेशनला या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी व नागरिकांनी भाजपाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. मुलुंड भागात भाजपाचे सहा नगरसेवक तर एक आमदार असूनही त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला नाही. मुलुंडकरांची मते घेण्यासाठी त्यांना खोटी आश्वासने दिली की या ठिकाणी धारावी प्रकल्प होऊ देणार नाही, मात्र तसे झाले नाही, निवडणुक झाल्यानंतर मुलुंड मधील 58 एकर जमीन अदाणीला देण्यात आली. एक प्रकारे मुलुंडकरांची ही फसवणूक आहे आणि ती भाजपाने केली आहे. येणाऱ्या काळात मुलुंडकर भाजपाच्या नेत्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.
भाजपाचा एक स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांचे नावच खोटेचा आहे. त्याने मुलुंडकरांना खोटी आश्वासन दिली. की या ठिकाणी धारावीकरांचे पुनर्वसन होऊ देणार नाही. मात्र त्यांनी या प्रकल्पाला साधा विरोध ही केला नाही. आता त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ. धारावीकरांच्या पुनर्वसनाला मुलुंडमध्ये आमचा विरोध असून त्याला आम्ही कडाडून विरोध करू. अश्या तीव्र शब्दात शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी भाजपावर टीका केली.