आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गोल्ड तस्करीचा पर्दाफाश

तीन प्रवाशांसह विमानतळावरील कर्मचार्‍याला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – दुबईहून आणलेल्या गोल्ड तस्करीचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकार्‍यांनी पदार्फाश केला. याप्रकरणात दुबईहून आलेल्या तीन प्रवाशांसह विमानतळावरील एक कर्मचारी अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. या चौघांकडून २ किलो ८३० ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले असून त्याची किंमत सुमारे सव्वादोन कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.

गोल्ड तस्करीच्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकार्‍यांनी संशयित प्रवाशांची तपासणी सुरु केली होती. ही कारवाई सुरु असताना दुबईहून आलेल्या तीन प्रवाशांना या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनी दुबईहून सोने आणल्याची कबुली दिली. ते सोने विमानतळावर बाहेर नेण्यासाठी त्यांना विमानतळावरील डिपार्चर हॉलमध्ये काम करणारा एक कर्मचारी मदत करत असल्याचे सांगितले. या माहितीनंतर या कर्मचार्‍यालाही या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ातब्या तघेतले होते. तपासात या तिन्ही प्रवाशांनी पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये गोल्ड लपवून आणले होते. ती पिशवी दुकानातील ब्रँडेड ज्यूट बॅगमध्ये ठेवण्यात आले होते. हीच बॅग हा कर्मचारी विमानतळाबाहेर आणून या तिन्ही प्रवाशांना देणार होता. मात्र सोने तस्करीचा या चौघांचा प्रयत्न कस्टम अधिकार्‍यांनी हाणून पाडला आहे. त्यांच्याकडील सामानातून या अधिकार्‍यांनी सुमारे सव्वादोन कोटीचे गोल्ड धूळ जप्त केली आहे. या चौघांविरुद्ध सीमा शुल्क कायदा १९६२ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page