मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० फेब्रुवारी २०२५
मुंबई, – समय रैना यांच्या लोकप्रिय यूट्यूब रिअलिटी शो इंडिया गॉट लेटेंड कार्यक्रमाच्या माध्यमातून वादग्रस्त आणि आक्षेपार्ह टिका केल्याप्रकरणी यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया याच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्यासह कार्यक्रमांत सहभागी झालेल्या इतरांविरुद्ध खार पोलीस ठाण्यात तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या संपूर्ण घटनेची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून खार पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहे. या चौकशीनंतर संबंधितांवर गुन्हा होणार आहे.
रणवीर अलाहाबादिया हा सोशल मिडीयावर प्रचंड लोकप्रिय असून एक्सवर त्याचे सहा लाख, इंटाग्रामवर साडेचार दशलक्ष फॉलोअर्स आहे. त्याचा स्वतचा यूट्युूब चॅनेल असून त्याचे साडेदहा दशलक्ष सबस्क्राबर्स आहेत. त्याच्या आक्षेपार्ह विधानानंतर सोशल मिडीयावर त्याला सर्वात जास्त टार्गेट केले आहे. काही दिवसांपूर्वी कॉमेडियन समन रैना याने त्याच्या इंडिया गॉट लेटेंट या कार्यक्रमांत यूट्यूबर आशिष चंचलानी, अपूर्वा मुखिजा आणि रणवीर अलाहाबादिया यांना निमंत्रण दिले होते. या कार्यक्रमांक पाहुणा म्हणून आलेल्या रणवीरने काही आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर सोशल मिडीयावर प्रचंड टिका झाली होती.
हा प्रकार लक्षात येताच रणवीरकडून जाहीर माफी मागण्यात आली होती. मात्र माफी मागूनही त्याच्यावर सोशल मिडीयावर टिका सुरुच होती. त्याच्या या विधानाची काही वकिलांनी गंभीर दखल घेत त्याच्याविरुद्ध खार पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर खार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. सोमवारी दुपारी खार पोलिसांचे एक विशेष पथक एका इमारतीमध्ये गेले होते. तिथेच कार्यक्रमांचे चित्रीकरण झाले होते. त्यामुळे कार्याक्रमांचे आयोजक, ऑनलाईन प्लॅटफॉर्म, कलाकारासह इतरांची पोलिसांनी चौकशी केली होती.
या चौकशीचा अहवाल लवकरच वरिष्ठांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या आदेशानंतर संबंधितांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जाणार आहे. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्याने खार पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. या चौकशीनंतर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल असे पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता.