घातक शस्त्रांसह ३६ वर्षांच्या आरोपीस अटक
देशी बनावटीचा कट्टा, दोन काडतुसे हस्तगत
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – घातक शस्त्रांसह एका ३६ वर्षांच्या आरोपीस अटक कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. जयेश हेमंत बेंडले असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचा कट्टा, दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
काही दिवसांपूर्वी जयेशविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांत गंभीर दुखापतीसह शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. या गुन्ह्यांत फरार असलेल्या जयेशला नंतर पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीदरम्यान त्याची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. यावेळी त्याने त्याच्याकडे घातक शस्त्रे असल्याची कबुली दिली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयाज रणवरे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ, इनामदार, ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक थोरात, धीरज वायकोस, पोलीस हवालदार गणेश पाटील, पोलीस शिपाई महेंद्र महाले, राहुल सांगळे, अमोल फोपसे, अनिकेत सकपाळ, संजय भोये, विकेश शिंगटे, तुषार पुजारी यांनी त्याच्या राहत्या घरातून एक देशी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी केली तर गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक धीरज वायकोस हे करत आहेत.