बनावट अप्स बनवून लावला चुना 

अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

0
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – एका खासगी ट्रेडिंग कंपनीचे बनावट अप्स आणि बनावट संकेस्थळ, व्हाट्स पग्रुप बनवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. 
दादर येथे एका खासगी शेअर ट्रेडिंग कंपनीचे कार्यालय आहे. गेल्या वर्षी कंपनीला गुंतवणूकदारांकडून काही माहिती मिळाली होती. ठगाने कंपनीच्या नावाने बनावट वेबसाईड आणि अप्स बनवल्याचे सांगण्यात आले. तसेच गुंतवणूकदाराचा विश्वास बसावा म्हणून व्हाट्सअपवर ग्रुपदेखील बनवला होता. व्हाट्सअप ग्रुप बनवून गुंतवणूक दाराची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्या ग्रुपमधील एडमिन ने आणखी काही ग्रुप तयार केले.
बनावट अप्स आणि व्हाट्स अप ग्रुप बाबत माहिती समजल्यावर कंपनीने प्रबोधन म्हणून जनजागृती देखील केली होती. तरी देखील अनेक लोकांनी बनावट अप्स द्वारे गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. अनेक गुंतवणूकदारांनी देखील कंपनीच्या कॉल सेंटर मध्ये फोन करून फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. गुंतवणूकदाराची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सेबी आणि स्टॉक एक्सचेंज कडून कंपनीला ईमेलवर तक्रारी आल्याची नोंद आहे. फसवणूकप्रकरणी कंपनीने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या तक्रार अर्जावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page