मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – पवईतील हिरानंदानीसारख्या पॉश परिसरातील एका स्पामध्ये चालणार्या सेक्स रॅकेटचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी आदेश या स्पाच्य मॅनेजरसह मालक-चालकाला पोलिसांनी अटक केली तर दोन तरुणींची सुटका केली. दोन्ही तरुणींना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले तर मॅनेजरला विशेष लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पवईतील हिरानंदानी गार्डन, पवई प्लाझाच्या पहिल्या मजल्यावर रुद्रा फॅमिली सलून नावाचे एक स्पा आहे. या स्पामध्ये मसाजच्या नावाने तिथे काम करणार्या महिलांच्या मदतीने सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर बोगस ग्राहकाच्या मदतीने पोलिसांकडून शहानिशा करण्यात आली होती. स्पामध्ये गेलेल्या बोगस ग्राहकाला मॅनेजरशी चर्चा केल्यानंतर तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचे समजले. त्याच्याकडून इशारा प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पारटकर, माने, पोलीस हवालदार लांडगे, खंडागळे, पोलीस शिपाई राकेश अहिरे, महिला पोलीस शिपाई येवले यांनी तिथे छापा टाकला होता. यावेळी पोलिसांनी स्पाचा मॅनेजर आदेशला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तोच या स्पाचा मालक आणि चालक होता. घटनास्थळाहून पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली.
त्यांच्या चौकशीत स्पामध्ये मसाजच्या नावाने सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले. ग्राहकांकडून मिळालेल्या पैशांतून त्यांना आदेशकडून ठराविक रक्कमेचे कमिशन दिले जात होते. हा प्रकार उघडकीस येताच त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहितासह पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. बळीत दोन्ही तरुणींना मेडीकलनंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाई पोलिसांनी एक मोबाईल, तीन हजाराची कॅश, दहा हजार पेटीम युपीआय स्वाईप केलेली मशिन, बँकेचे एक स्कॅनर आदी मुद्देमाल जप्त केला आहे.