खाकी वर्दीने घडवून आणला व्हेलेंटाईन डे

सतरा वर्षांनी झाली पती-पत्नीची भेट

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – घरातून निघून गेलेला मिसिंग पती पत्नीला सापडला आणि सतरा वर्षांनी खाकी वर्दीने या दोघांचा व्हेलेंटाईन डे घडवून आणला. काळाचौकी पोलिसांनी केलेल्या अश्रक परिश्रमानंतर या पती-पत्नीची तब्बल सतरा वर्षांनी भेट झाली. मिसिंग झालेला पती समोर आणून काळाचौकी पोलिसांनी पत्नीला व्हेलेटाईन गिफ्ट दिल्याचे बोलले जाते. या कामगिरीबाबत काळाचौकी पोलिसांचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे.

५९ वर्षांची तक्रारदार महिला ही काळाचौकी परिसरात राहते. २००७ साली तिचे पती घर सोडून निघून गेले होते. त्यानंतर ते घरी परत आले नाही. तिने तिच्या पतीचा सर्वत्र शोध घेतला, तिच्या नातेवाईक, मित्रांसह परिचितांकडे त्यांचा शोध सुरु ठेवला होता. मात्र बरेच प्रयत्नही तिला तिचा पती सापडला नव्हता. त्यामुळे तिने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत काळाचौकी पोलिसांना तक्रारदार महिलेचा शोध घेण्याची विनंती केली होती. त्याची वरिष्ठांनी दखल घेत काळाचौकी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. सतरा वर्षांनी तक्रारदार महिलेने तिचा पती चंद्रकांत कानू जोशी यांच्या मिसिंगची काळाचौकी पोलीस ठाण्यात केली होती. त्यामुळे सतरा वर्षांपूर्वी मिसिंग झालेल्या व्यक्तीचा शोध घेणे पोलिसांसाठी एक आव्हान होते.

मात्र वरिष्ठांच्या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनिल पारसकर, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त धनश्याम पलंगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष श्रीधनकर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश मराठे, पोलीस उपनिरीक्षक रमेश पवार, पोलीस हवालदार योगेश बागडे, पोलीस शिपाई हंसराज देशमुख यांनी तपास सुरु केला होता. यावेळी पोलिसांनी तिच्या नातेवाईकासह मित्रांची पुन्हा नव्याने चौकशी सुरु केली होती. मात्र त्यांच्याकडून त्याचा शोध लागेल अशी कुठलीही माहिती मिळाली नाही. तरीही पोलिसांनी वेगवेगळ्या तांत्रिक पद्धतीने त्याचा शोध सुरु केला होता. याच दरम्यान चंद्रकांतच्या एका मित्राकडून त्याला दहा वर्षापूर्वी मुरबाड येथे एका फार्महाऊसवर पाहिल्याची माहिती प्राप्त झाली होती.

या माहितीनंतर पोलिसांनी मुरबाडच्या प्रत्येक फार्महाऊसवर चंद्रकांत जोशीचा शोध सुरु केला होता. ही शोधमेहीम सुरु असताना मौजा चौरे गावातील एका फार्महाऊसमध्ये चंद्रकांत पोलिसांना सापडला. त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्या पत्नीसमोर हजर करण्यात आले होते. यावेळी तिने तिच्या पतीला ओळखले. तो तिचा पती असल्याची खात्री होताच त्याला तिच्यासोबत पाठविण्यात आले होते. सतरा वर्षांनंतर तक्रारदार महिला तिचा मिसिंग पती सापडला होता. खाकी वर्दीमुळे या पती-पत्नीची भेट घडवून आणून पोलिसांना त्यांना व्हेलेटाईन गिफ्ट दिले होते. त्यामुळे तिने काळाचौकी पोलिसांचे आभार व्यक्त केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page