मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – नवोदित वकिलांना पैसे नाही तर काम मिळणे महत्वाचे आहे. घटनेने आणि कायद्याने आपल्याला व सर्वसामान्यांना दिलेले हक्क व अधिकार खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत आणि कारागृहातील कैद्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम दर्द से हम दर्द तक संस्था करीत आहे आणि तेच अभिमानास्पद असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी व्यक्त केले.
देशात पहिल्यादाच लीगल ऑन व्हील ही संकल्पना दर्द से हम दर्द ट्रस्टच्या वतीने अंमलात आणली. लीगल ऑन व्हील हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, प्रवीण फलदेसाई, उप महाधिवक्ता, भारत सरकार, सत्र व दिवाणी न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम, मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हर्षद अहिरराव आदी मान्यवर उपस्थित होते..
शासनाच्या विधी सेवा प्राधिकरणामार्फत पोचवल्या जाणाऱ्या सेवे प्रमाणेच या ट्रस्ट तर्फे अतिशय जलदगतीने राज्यातील कारागृहांमध्ये मोफत कायदेविषयक मदत करण्याचे काम सुरू असल्याने न्यायमूर्ती कर्णिक यांनी संस्थेचे कौतुक केले. विधी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच नवोदित वकिलांसाठी ही संस्था अतिशय उपयुक्त ठरत आहे .सर्वांना मिळणारा कामाचा प्रत्यक्ष अनुभव व मिळणारी संधी हे खरंच वाखाणण्याजोगे असल्याचे मत न्यायमूर्ती कर्णिक यांनी व्यक्त केले.
उप महाधिवक्ता प्रवीण फल देसाई यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विधी शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मागदर्शन केले. लीगल एड ऑन व्हीलच्या माध्यमातून दोन व्हॅन या गाव खेड्या पासून वस्त्या मध्ये जाणार आहे. वकील आपल्या दारी या संकल्पनेतून सुरू झालेला उपक्रम द्वारे संस्थेचे स्वयंसेवक वकील हे वेगवेगळ्या वस्तीमध्ये शाळेमध्ये कॉलेजमध्ये कोर्ट परिसर असेच पोलीस स्टेशन अशा ठिकाणी जाऊन लोकांना वेगवेगळ्या विषयात विनामूल्य कायदेशीर मार्गदर्शन करणार असल्याचे संस्थेच्या ट्रस्टी सुनीता साळशिंगीकर यांनी सांगितले.