मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 फेब्रुवारी 2025
मुंबई, – बँकाँकहून आणलेल्या सुमारे 56 कोटीच्या हायड्रो पॉनिक गांजासह पाच प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने अटक केली. या पाचही प्रवाशांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात डायड्रो पॉनिक गांजा पकडण्याची चालू वर्षांतील ही पहिलीच घटना आहे.
ड्रग्ज तस्करीविरोधात सीमा शुल्क विभागाची मोहीम सुरु असताना बँकाँकहून काही प्रवाशी हायड्रो पॉनिक गांजाची तस्करी करणार असल्याची माहिती या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या अधिकार्यांनी बँकाँकहून येणार्या प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या सामानाची तपासणी सुरु केली होती. याच दरम्यान पाच संशयित प्रवाशांना या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या सामानाच्या तपासणीदरम्यान त्यात 56 किलो 260 ग्रॅम वजनाचा उच्च प्रतीचा हायड्रो पॉनिक गांजाचा साठा सापडला. आंतरराष्ट्रीय विमानतळावर या गांजाची किंमत 56 कोटी 26 लाख रुपये इतकी आहे.
हा गांजा ते सर्वजण ट्रॉली बॅगेत एका विशिष्ट जागा करुन विमानतळाबाहेर नेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र विमानतळाबाहेर जाण्यापूर्वीच या पाचही प्रवाशांना सीमा शुल्क विभागाने अटक केली. हा गांता त्यांना बँकाँकहून काही व्यक्तींनी दिला होता. विमानतळाबाहेर त्यांना एका व्यक्तीकडे तो गांजा देण्यास सांगण्यात आले. त्यासाठी त्यांना बँकाँक ते मुंबई असा विमानाचे तिकिट आणि काही रक्कम कमिशन देण्याचे ठरले होते. त्यांच्याविरुद्ध नार्कोटिक ड्रग्ज अॅण्ड सायको टॉपिक बसस्टेन्स (एनडीपीएस) कलमांतर्गत कारवाई करुन नंतर अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.