गुटखा तस्करीप्रकरणी दोन आरोपींना अटक

ट्रकसहीत 59 लाखांचा गुटख्याचा साठा जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 फेब्रुवारी 2025
मुंबई, – गुटखा तस्करीप्रकरणी दोन आरोपींना डोंगरी पोलिसांनी वाडीबंदर परिसरातून अटक केली. रबीउल इस्लाम अलीहुसैन शेख आणि नीरजकुमार सिंग अशी या दोघांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी अवैध गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य वस्तू असा सुमारे 57 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडीत आहे. या दोघांच्या चौकशीतून इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

पोलीस शिपाई जयेश प्रकाश गोळे हे डोंगरी पोलीस ठाण्यात मिल्स स्पेशल म्हणून कार्यरत आहेत. परिसरात गस्त घालत असताना वाडीबंदर परिसरात काहीजण राज्य शासनाने बंदी घातलेल्या गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य वस्तूची अवैधरीत्या वाहतूक करणार असल्याची माहिती जयेश गोळे यांना मिळाली होती. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस आयुक्त तन्वीर शेख, प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन कोतमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, लाड, पोलीस उपनिरीक्षक गोकुळ शिंदे, पोलीस शिपाई जयेश गोळे, तडवी, पोलीस हवालदार सोनावणे, कदम, साटम, देशमुख यांनी वाडीबंदर परिसरात साध्या वेळात पाळत ठेवली होती.

रात्री उशिरा पी डिमेलो रोड, दक्षिण वाहिनीवर एका ट्रकला पोलिसांनी थांबवून आतील सामानाची झडती घेतली होती. यावेळी ट्रकमध्ये पोलिसांना सुमारे 59 लाखांचा गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य वस्तू सापडले. याच गुन्ह्यांत नंतर रबीउल शेख आणि नीरज सिंग या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता फुड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड रेग्युलेशन कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना शनिवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्यांनी यापूर्वीही गुटख्याची तस्करी केली आहे, त्यांना हा साठा कोणी दिला होता आणि ते कोणाला देणार होते. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page