घरासमोर झोपलेल्या मायलेकाला कारने चिरडले

दिड वर्षांच्या मुलाचा मृत्यू तर आई गंभीर जखमी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 फेब्रुवारी 2025
मुंबई, – घरासमोरच झोपलेल्या मायलेकाला भरवेगात जाणार्‍या एका कारने जोरात धडक दिली होती. त्यात वरदान निखिल लोंढे या दिड वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला तर त्याची आई प्रिया निखिल लोंढे ही गंभीररीत्या जखमी झाली. तिच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरोपी कारचालक कमल विजय राय याच्याविरुद्ध रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी हलर्जीपणाचा गुन्हा दाखल करुन त्याला या गुन्ह्यांत अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

हा अपघात वडाळा येथील बाळाराम खेडेकर मार्ग, रामंदिराशेजारील मांग गारोडी समाज झोपडपट्टीत घडली होती. याच परिसरात प्रिया लोंढे ही तिचे पती निखिल, पाच वर्षांचा मुलगा स्वरुप आणि अठरा महिन्यांचा मुलगा वरदानसोबत राहते. तिचे पती एका खाजगी कंपनीत कामाला आहे. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता ती तिच्या अठरा महिन्यांचा मुलगा वरदानसोबत झोपली होती. काही वेळात वरदान हा झोपला आणि तिलाही झोप आली होती. काही वेळानंतर तिला तिच्या अंगावरुन काहीतरी गेल्याचा भास झाला होता. तिने उठण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा डावा खांदा खूप जड झाला होता. काही वेळानंतर तिला तिच्या अंगावर एक वाहन गेल्याचे समजले होते. त्यामुळे तिने आरडाओरड केला होता. तिचा आवाज ऐकून स्थानिक रहिवाशी तिथे जमा झाले होते. यावेळी स्थानिक रहिवाशांनी अपघातात जखमी झालेल्या प्रियासह तिचा मुलगा वरदारन या दोघांनाही वाडिया हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे वरदानला एक वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले तर प्रियाची दुखापत गंभीर असल्याने तिला केईएम हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते.

तिने एका पांढर्‍या रंगाच्या कारला पळून जाताना पाहिले होते. स्थानिक रहिवाशांनी कारचा चालक कमल रिया याला ताब्यात घेतले होते. कमल हा वडाळा येथील कात्रक रोड, भव्य हाईट्स इमारतीमध्ये राहतो. त्याला नंतर त्याला आर. के मार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याप्रकरणी प्रियाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कमल रायविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून एका अठरा महिन्यांच्या मुलाच्या मृत्यूस तसेच तिला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याची जामिनावर सोडून देण्यात आले. कमल याची मेडीकल करण्यात आली असून कार चालविताना त्याने मद्यप्राशन केले होते का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page