बोगस कागदपत्रांच्या आधारे कार लोन घेणार्‍या टोळीचा पर्दाफाश

बँकेसह अनेकांची टोळीकडून फसवणुक झाल्याचे तपासात उघड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 फेब्रुवारी 2025
मुंबई, – बोगस कागदपत्रांया आधारे विविध बँकांकडून कार लोन घेऊन नामांकित कंपन्यांच्या कार खरेदी करुन त्या कारची विविध राज्यात विक्री किंवा गहाण ठेवून बँकांसह सामान्य लोकांची फसवणुक करणार्‍या एका सराईत टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मुंबईसह इतर शहरात कारवाई करुन पोलिसांनी सातजणांना अटक केली आहे. रविंद्र दिनानाथ गिरकर ऊर्फ परदिप रविंदर शर्मा, मनिष सुभाष शर्मा, सय्यद नावेद सय्यद जुल्फीकार अली, दानिक रफिक खान, साईनाथ व्यकंटेश गंजी, यशकुमार सुनिल जैन आणि इम्रान अब्दुल वाहिद खान ऊर्फ देवा अशी या सातजणांची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी अकरा मोबाईल, दोन लॅपटॉप, दोन पेनड्राईव्ह, गुन्ह्यांतील सोळा महागड्या कार असा सहा कोटी तीस लाख अठ्ठावीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहेत. अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.

तक्रारदार हे खासगी फायनान्स कंपनीत काम करतात. तीन वर्षांपूर्वी प्रदीप रवींद्र शर्माने त्याच्या कंपनीतून वाहनासाठी कर्ज घेतले होते. वाहन घेण्यासाठी त्याने बनावट कागदपत्रांचा वापर केला. त्या आधारे १६ लाखांचे कर्ज घेण्यात आले. हा प्रकार कंपनीच्या लक्षात आला. त्यानंतर कंपनीने प्रदीप शर्मा विरोधात गुन्हा नोंद केला होता. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे युनिट ३ करत होते. तपासा दरम्यान सहायक निरीक्षक अमोल माळी याना महत्वाची माहिती मिळाली. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन वाहनांची विक्री करणारे आंतरराज्य रॅकेट असल्याचे समोर आले. त्यानंतर तपासासाठी दहा पथक तयार केली. पोलिसांनी मुंबई, ठाणे, इंदोर, राजस्थान, अहमदाबाद येथून त्या चौघांना ताब्यात घेऊन अटक केली.
त्या चौघांनी त्याच्या साथीदाराच्या मदतीने खासगी बँक आणि फायनान्स कंपनी कडून बनावट नावाने कर्ज घेऊन ती वाहन विक्री आणि गहाण ठेवल्या. तसेच ज्या मॉडेलच्या गाड्या खरेदी केल्या आहेत, त्या मॉडेल च्या गाड्या पर राज्यातून चोरल्या. त्या गाड्याचा चेसिस नंबर ते बदलत असायचे. त्यानंतर गाड्याची विक्री करायचे. पोलिसांनी तपास करून १६ महागड्या गाड्या जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या गाड्याची किंमत सुमारे ७ कोटी ६३ लाख रुपये इतकी आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी आता पर्यंत ७ जणांना अटक केली आहे.
मनीष शर्मा आणि साईनाथ हे ऑनलाईन पद्धतीने राज्य बाहेरील व्यापारी लोकांचा जी एस टी चा डेटा घेतात. त्या डेटाच्या आधारे व्यापारी याचा पॅनकार्ड नंबर पेड अप्सचा वापर करून त्याचा सिबिल स्कोअर चेक करतात. ज्या व्यापाऱ्यांचा सिबिल स्कोर चांगला आहे, अशाचा ते डेटा घेतात. त्यानंतर पेड अप्सवरून रवींद्र आणि त्याच्या सारख्या अन्य दिसणाऱ्या व्यक्तीचे फोटो लावून बनावट पॅन कार्ड तयार करतात. त्या कागद्पत्रांच्या आधारे उच्चचभ्रु सोसायटी मध्ये ते कार्यालय घेतात. तसेच सहकारी बॅंकामध्ये खाती उघडतात. खात्यामध्ये पैशाच्या उलाढाल केली जाते. उलाढाल झाल्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे शो रूम मध्ये जाऊन गाड्या बुक करतात. त्या गाड्यासाठी विविध बँक आणि फायनान्स कंपनी कडून कर्ज मंजूर करून घेतात. गाडी विक्री करणारे दानिश खान, यश जैन, इम्रान देवा, हे राज्याबाहेर कार्यालय घेऊन कार डीलिंगचा व्यवसाय करतात. जागा भाड्याने घेण्यासाठी सययद नावेद हा त्यांना पैसे पुरवत असायचा. गाड्यावर कर्ज मंजूर झाल्यावर ती वाहने शो रूम बाहेर काढायचे. दानिश, यश आणि इम्रान हे त्याची विक्री करायचे. गाडी विक्री केल्यावर ते पैसे वाटून घेत असायचे. गाडी विक्री झाल्यावर कोणालाही संशय येऊ नये म्हणून ते भाड्याने घेतलेले जागा आणि मोबाईल नंबर बंद करून पसार होत असायचे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल चंद्रमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, पोलीस निरीक्षक शामराव पाटील, शरद धराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर मुजावर, अमोल माळी, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत शिरसाठ, गोरेगावकर, सहाय्यक फौजदार कृतीबस राऊळ, पोलीस हवालदार घाटकर, विनोद परब, रविंद्र देवार्डे, अशोक पाटील, राजेश चव्हाण, राहुल अनाभुले, आकाश मांगले, वैभव गिरकर, सुहास कांबळे, युवराज देशमुख, गिरीश मोरे, भास्कर गायकवाड, पोलीस शिपाई पंकज भोसले, विकास चव्हाण, राहुल पाटील, दिपा सोनार, स्वप्नाली देशमुख, अभिकेत मोरे, लक्ष्मण दाईगडे, पोलीस हवालदार धर्मेंद्र जुवाटकर, पोलीस शिपाई शेखर वेडगे, मालमत्ता कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश कन्हेरकर, पोलीस हवालदार अमीत तांबे, पोलीस शिपाई संजय गायकवाड, निलेश डोंबाळे, युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश शेलार, पोलीस उपनिरीक्षक संजय भावे, सहाय्यक फौजदार अविनाश निंबाळकर, पोलीस हवालदार रविंद्र राणे, अमोल साळुंखे, युनिट चारचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम भिसे, पोलीस हवालदार कोचरेकर, संजय गायकवाड, युनिट पाचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप जाधव, पोलीस शिपाई गणेश काळे, युवराज सावंत, भाऊसाहेब पवार, गुप्तावार्ता विभागाचे पोलीस शिपाई अविनाश गावडे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page