मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 मार्च 2025
मुंबई, – पार्टटाईम जॉबची ऑफर देत एका महिलेची सुमारे बारा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन सायबर सेल पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्याची माहिती काढली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने अशाच प्रकारे अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे बोलले जाते.

खार येथे तक्रारदार महिला राहतात. त्याचे सोशल मीडियावर खाते आहे. त्याना सोशल मीडिया खात्यावर पार्टटाईम नोकरीसाठी मेसेज आला. गुगल मॅपवर रेटिंग दिल्यावर पैसे मिळतील असे त्याना सांगितले. तसेच रोज ३०० रुपये कमवू शकतात अशा त्याना भूलथापा मारल्या. त्याने डेमो म्हणून एक टास्क पाठवला. त्या टास्कला एक कोड देखील दिला. प्रत्येक कामाचा पगार दिला जाईल असे त्याना सांगण्यात आले. त्यानंतर त्याना टेलिग्राम ग्रुप वर जोडले गेले. त्या ग्रुपवर रोज टास्क दिले जायचे. त्यात तिसरा हा पेड टास्क असायचा. प्रत्यकाने आपल्या बँकेमधून पैसे भरायचे आणि अधिक पैसे कमवायचे असे त्याना सांगण्यात आले. प्रति रेटिंगला ते ५० रुपये देऊ लागले.
तसेच पेड टास्क हा ९०० रुपयाचा होता. त्या टास्क साठी त्याना एका ग्रुप मध्ये जोडले गेले. त्यात आणखी जण होते. टास्कसाठी त्यांना सुरुवातीला २८ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन त्याने पैसे भरले. पैसे भरल्यावर तो टास्क नीट पूर्ण केला नाही असे त्याना सांगून पुन्हा पैसे भरण्यास सांगितले. त्याने टास्कच्या नावाखाली १२ लाख रुपये विविध खात्यात जमा केले. त्याचा क्रेडिट स्कोर हा ४३ आहे. तो स्कोअर ८० असणे गरजेचे आहे. स्कोर वाढण्यासाठी आणखी ३७ स्कोअर खरेदी करण्यास त्याना आणखी २ लाख ९१ हजार रुपये भरण्यास सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.