पूर्ववैमस्नातून चौदा वर्षांच्या मुलावर सुर्याने प्राणघातक हल्ला
आरोपीस अटक तर मुलाची डोंगरी सुधारगृहात रवानगी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 मार्च 2025
मुंबई, – पूर्ववैमस्नातून साद नावाच्या एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर दोघांनी मासे कापण्याच्या सुर्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात साद हा जखमी झाल्याने त्याच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून सगीर अहमद हसन शेख या 52 वर्षांच्या आरोपीस अटक केली तर तेरा वर्षांच्या हबीबूर या मुलाची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी केली आहे.
ही घटना शुक्रवारी रात्री सव्वाअकरा वाजता गोवंडीतील बैंगनवाडी, कादरी कलंदरीया मशिदीजवळील रोड क्रमांक चौदासमोर घडली. शाद हा मुलगा याच परिसरात राहत असून सध्या शिक्षण घेतो. सगीरसह तेरा वर्षांचा हबीबूर हा याच परिसरात राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. त्यांच्यात जुना वाद होता. या वादातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. शुक्रवारी रात्री साद हा त्याच्या मित्राला उसने दिलेले पैसे घेऊन घराच्या दिशेने जात होता. यावेळी तिथे दोन्ही आरोपी उभे होते. सादला पाहिल्यानंतर त्यांनी त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती.
याच दरम्यान त्यांनी मासे कापण्याच्या सुर्याने सादवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या मानेवर आणि हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर ते दोघेही पळून गेले होते. हा प्रकार निदर्शनास येताच स्थानिक रहिवाशांनी हल्ल्यात जखमी झालेल्या सादला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला घरी पाठविण्यात आले होते. ही माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी सादची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सगीर शेख आणि हबीबूर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांनाही गोवंडी येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर सगीर शेखला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली तर हबीबूर हा अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.