मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 मार्च 2025
मुंबई, – खाजगी शिकवणीसाठी येणार्या एका तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाशी सोशल मिडीयावरुन बोगस नावाने तरुणीच्या नावे चॅटींग करुन त्याच्याकडून घेतलेल्या अश्लील व्हिडीओचा गैरफायदा घेऊन क्लासच्या शिक्षकाने अनैसगिंक लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अनैसगिक लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी शिक्षकाला आरे पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये बळीत मुलाचे काही अश्लील व्हिडीओ असून त्याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
36 वर्षांची तक्रारदार महिला ही गोरेगाव येथे राहते. तिला तेरा वर्षांचा मुलगा असून तो गोरेगाव येथील एका खाजगी शाळेत शिकतो. याच परिसरातील एका खाजगी शिकवणीसाठी तो जात होता. तिथेच आरोपी शिक्षक म्हणून काम करत होता. बळीत मुलगा अल्पवयीन असल्याचे माहित असताना त्याने मानवी नावाच्या महिलेचा इंटाग्रामवर अकाऊंट उघडून त्याच्याशी चॅटींग सुरु केले होते. या चॅटदरम्यान तो त्याच्याशी अनेकदा अश्लील संभाषण करत होता. त्याच्याशी एक तरुणी बोलत असल्याचे भासवून त्याला अश्लील चाळे करताना व्हिडीओ बनविण्यास प्रवृत्त केले होते. त्यानंतर पाठविलेले व्हिडीओनंतर त्याने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. त्याचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने त्याच्यावर अनैसगिक लैगिंक अत्याचार केला होता.
इतकेच नव्हे तर त्याचे अत्याचारादरम्यान पुन्हा काही अश्लील व्हिडीओ बनविले होते. तो व्हिडीओ दाखवून त्याने त्याच्यावर ऑक्टोंबर 2023 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत अनेकदा अनैसगिंक लैगिंक अत्याचार केला होता. शिक्षकाकडून सुरु असलेल्या या लैगिंक अत्याचाराला तो कंटाळून गेला होता. त्यामुळे त्याने घडलेला प्रकार त्याच्या आईला सांगितला होता. मुलाकडून ही माहिती समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने आरे पोलिसांना हा प्रकार सांगून आरोपी शिक्षकाविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अनैसगिंक लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी शिक्षकाला शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. बळीत मुलगा आणि आरोपी शिक्षक एकाच परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.