होळी-रंगपंचमीनिमित्त स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांची मोहीम
183 मद्यपी, 4949 विनाहेल्मेट तर 425 ट्रिपल सीट चालकांवर कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 मार्च 2025
मुंबई, – होळी आणि रंगपंचमीनिमित्त शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिीसांनी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला असतानाच स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लघंन करणार्या वाहनचालकांना चांगलाच दणका दिला. दोन दिवसांत 183 मद्यपी, 4 हजार 949 विनाहेल्मेट तर 425 ट्रिपल सीट चालकावर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी विविध वाहतूक नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी 17 हजार 495 चालकाविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे. या चालकाकडून 1 कोटी 79 लाख 79 हजार 250 रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
होळी आणि रंगपंचमीनिमित्त शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच या सणाला कुठेही गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. अनेकदा होळी आणि रंगपंचमीला काही वाहनचालक मद्यप्राशन करुन वाहन चालवतात. जेणेकरुन अपघाताच्या घटना घडतात. अशा घटनांना रोखण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे उल्लघंन करणार्या वाहनचालकाविरुद्ध स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी संपूर्ण शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरुवारी 13 मार्च आणि शुक्रवार 14 मार्च या दोन दिवसांत शहरात सात अतिरिक्त पोलीस आयुक्त, एकोणीस पोलीस उपायुक्त, 51 सहाय्यक पोलीस आयुक्त, 1767 पोलीस अधिकारी, 9145 पोलीस अंमलदार असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ प्लाटून, क्यूआरटी टिम, बीडीडीएस टिम, होमगार्डस आदींना मदतीसाठी ठेवण्यात आले आहे. पोलीस दलातर्फे ठिकठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. गर्दीच्या ठिकाणी गस्त आणि फिक्स पॉईट बंदोबस्त नेमण्यात आले होते. वाहतूक नियमांचे उल्लघंन व ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली होती.
13 मार्चला 1827 विनाहेल्मेट चालकावर कारवाई करुन 18 लाख 21 हजार रुपये, वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्या 3529 वाहनांवर 41 लाख 99 हजार रुपये, 1411 सिग्नल तोडणार्या वाहनचालकावर 13 लाख 79 हजार 500 रुपये, 328 विना एमडीएल वाहन चालविणार्या चालकाविरुद्ध 2 लाख 80 हजार 500 रुपये, 83 ट्रिपल सीट चालकाविरुद्ध 82 हजार रुपये, 811 चालकावर वन वे प्रवेश बंदी असताना वाहन चालविल्याप्रकरणी 9 लाख 84 हजार रुपये, 17 ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह, 39 हॉकिंग चालकाविरुद्ध 26 हजार रुपये तर विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याप्रकरणी 28 चालकावर कारवाई करण्यात आली आहे. 13 मार्चला 8 हजार 73 चालकावर कारवाई करुन त्यांच्याकडून 87 लाख 72 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.
14 मार्चला 3122 विनाहेल्मेट चालकावर कारवाई करुन 31 लाख 16 हजार रुपये, वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्या 1125 वाहनांवर 13 लाख 21 हजार 500 रुपये, 531 सिग्नल तोडणार्या वाहनचालकावर 5 लाख 22 हजार 500 रुपये, 498 विना एमडीएल वाहन चालविणार्या चालकाविरुद्ध 3 लाख 90 हजार रुपये, 342 ट्रिपल सीट चालकाविरुद्ध 3 लाख 42 हजार रुपये, 181 चालकावर वन वे प्रवेश बंदी असताना वाहन चालविल्याप्रकरणी 1 लाख 84 हजार 500 रुपये, 166 ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह, 6 हॉकिंग चालकाविरुद्ध 5 हजार 500 रुपये तर विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याप्रकरणी 5 चालकावर कारवाई करण्यात आली आहे. 14 मार्चला 9 हजार 422 चालकावर कारवाई करुन त्यांच्याकडून 92 लाख 7 हजार 250 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.