सोशल मिडीयावरुन सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

60 वर्षांच्या वयोवृद्धाला तर चार अ‍ॅक्टर तरुणींची सुटका

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 मार्च 2025
मुंबई, – सोशल मिडीयावरुन सुरु असलेल्या एका सेक्स रॅकेटचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी श्यामसुंदर नावाच्या एका साठ वर्षांच्या वयोवृद्धाला पोलिसांनी अटक केली. त्याच्या तावडीतून पोलिसांनी चार अ‍ॅक्टर तरुणींची सुटका केली असून मेडीकलनंतर या चौघांनाही महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या गुन्ह्यांत गौरव नावाच्या एका व्यक्तीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तो कांदिवलीतील चारकोप परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

श्यामसुंदर हा वयोवृद्ध मोबाईलसह व्हॉटअपच्या माध्यमातून हायफाय सेक्स रॅकेट चालवत असून तो मागणी केल्यास ग्राहकांसोबत काही मॉडेल व अ‍ॅक्टर तरुणींना विविध हॉटेल, गेस्ट हाऊस आणि लॉजमध्ये पाठवतो अशी पवई पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने संबंधित श्यामसुंदरला संपर्क साधून त्याच्याकडे काही अ‍ॅक्टर तरुणीची मागणी केली होती. फोनवरुन त्याचे बोगस ग्राहकासोबत आर्थिक व्यवहार झाला होता. प्रत्येकी एका अ‍ॅक्टर तरुणीमागे तीन लाख रुपये द्यावे लागतील असे या व्यक्तीने सांगितले होते. या व्यवहारानंतर या तरुणीला घेऊन पवईतील हिरानंदानी परिसरातील एका हॉटेलमध्ये घेऊन येण्यास सांगण्यात आले होते. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता तिथे आरोपी वयोवृद्ध चार तरुणीसोबत आला होता.

बोगस ग्राहकासोबत आर्थिक व्यवहार सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे, सूर्यकांत पारटकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, पोलीस हवालदार संदीप सुरवाडे, येडगे, महिला पोलीस शिपाई पवार, सोनकांबळे, ताडगे यांनी तिथे छापा टाकला होता. यावेळी एका 60 वर्षांच्या वयोवृद्धाला पोलिसांनी ताब्यात घेतले. श्यामसुंदर असे या आरोपीचे नाव असून तो अंधेरीतील आंबोली परिसरात राहतो. तो सोशल मिडीयाच्या माध्यमातून ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवत होता. याकामी त्याला गौरव नावाचा एक दलाल मदत करत होता.

त्यांच्या संपर्कात काही मॉडेल आणि अभिनय क्षेत्राशी संबंधित अभिनेत्री होते. त्यांना तो ग्राहकोसोबत शारीरिक संबंधासाठी पाठवत होता. एका अ‍ॅक्टरसाठी तो ग्राहकाकडून तीन लाख रुपये घेत होता. त्यापैकी दिड लाख तो स्वतकडे तर दिड लाख अ‍ॅक्टर तरुणीला देत होता. त्याच्या तावडीतून पोलिसांनी चार अ‍ॅक्टर तरुणींची सुटका केली. चौकशीदरम्यान त्या चौघीही अभिनय क्षेत्राशी संबंधित असून त्यापैकी काहींनी मॉडलिंग क्षेत्रानंतर अभिनय क्षेत्रात काम सुरु केले होते. काही हिंदी मालिकांमध्ये काम केल्याचे उघडकीस आले.

या चौघींनाही नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना देवनार येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते. याप्रकरणी श्यामसुंदरविरुद्ध भारतीय न्याय सहितासह पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी 5 लाख 85 हजाराचे आठ महागडे मोबाईल, 5 हजार 670 रुपयांची कॅश, तीन लाखांचे खेळण्याच्या नोटा असा 8 लाख 90 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page