मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 मार्च 2025
मुंबई, – प्रभादेवी आणि गोरेगाव येथून शाखेत काढलेल्या सुमारे 122 कोटीच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या एका वॉण्टेड आरोपीस अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे. कपिल देढिया असे या आरोपीचे नाव असून तो शासकीय कॉन्ट्रक्टर असल्याचे पोलिसांनी सांगितले. वडोदरा येथून मुंबईत आणल्यानंतर त्याला शनिवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला बुधवार 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
फेब्रुवारी महिन्यांत दुसर्या आठवड्यात न्यू इंडिया सहकारी बँकेत झालेल्या 122 कोटीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. गुन्हा दाखल होताच बँकेचा महाव्यवस्थापक हितेश प्रविणचंद्र मेहता, विकासक धर्मेश जयंतीलाल पौन, बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू सुरेंदरकुमार भोन आणि मनोहर उन्ननाथन अरुणाचलम या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. या चौकशीदरम्यान या गुन्ह्यांत उन्ननाथन अरुणाचलम ऊर्फ अरुणभाई, कपिल देढिया यांच्यासह बँकेच्या माजी अध्यक्षासह इतर आरोपींचा सहभाग उघडकीस आला होता. त्यातील काही आरोपी विदेशात पळून गेल्याने त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केले होते.
दुसरीकडे अरुणभाई आणि कपिल यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना कपिलला गुजरातच्या वडोदरा शहरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी शनिवारी सकाळी मुंबईत आणण्यात आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंतच्या चौकशीत फसवणुकीची बारा कोटीची रक्कम त्याच्याच बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. त्याला ही रक्कम धर्मेश पौन याने ही रक्कम दिली हाती. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.