एमडी ड्रग्ज बनविण्याचा कारखाना एनसीबीकडून उद्धवस्त

महाडच्या एमआयडीसी कारखान्यातून 50 कोटीचा मुद्देमाल जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 मार्च 2025
मुंबई, – एमडी ड्रग्ज बनविण्याचा कारखानाच नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई युनिटच्या अधिकार्‍यांनी उद्धवस्त केला. महाडच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या कारखान्यात छापा टाकून या अधिकार्‍यांनी सुमारे 50 कोटीचे एमडी ड्रग्जसहीत ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत दोघांना अटक करण्यात आली असून याच गुन्ह्यांत ते दोघेही एनसीबी कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई युनिटच्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना भांडुप परिसरात काहीजण एमडी ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा केल्यानंतर या पथकाने भांडुप येथून दोन संशयित तरुणांना अटक केली होती. त्यांच्याकडून या अधिकार्‍यांनी 46 किलो 800 ग्रॅम वजनाचे पावडरयुक्त एमडी ड्रग्ज जप्त केले होते. ते ड्रग्ज त्यांनी त्यांच्या घरातील प्लास्टिक कंटेनरमध्ये लपवून ठेवले होते. याच चौकशीदरम्यान त्यांनी महाड येथील एमआयडीसी परिसरात एमडी ड्रग्ज बनविण्याचा कारखाना सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनंतर या पथकाने महाडच्या एमआयडीसी परिसरातील एका गाळ्यात छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान तिथे एमडी ड्रग्ज बनविण्याचा कारखाना सुरु असल्याचे उघडकीस आले.

घटनास्थळाहून एनसीबीच्या अधिकार्‍यांनी मोठ्या प्रमाणात रसायने जप्त केले. दोन्ही कारवाईत या अधिकार्‍यांनी सुमारे 50 कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक आरोपींमध्ये एक औषधांचा पुरवठादार असून त्याच्याविरुद्ध डीआरआयने एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्यावर अटकेची कारवाई झाली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या जामिनावर बाहेर होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा एमडी ड्रग्ज बनविण्यास सुरुवात करुन त्याची विक्री सुरु केली होती. या दोघांविरुद्ध एनसीबीने एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page