कारची डिवायडरला धडक लागून तीनजण जखमी

मद्यप्राशन करुन कार चालविणार्‍या व्यापारी चालकास अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 एप्रिल 2025
मुंबई, – भरवेगात चालविण्याचा प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटल्याने कारची डिवायडरला धडक लागून झालेल्या अपघातात तीनजण जखमी झाले. त्यात हेतल पुरुषोत्तम रामजियानी, पार्थ नरेशभाई लिंबानी आणि नरेशकुमार कांतीलाल पोकार यांचा समावेश आहे. हेतल हा व्यापारी असून कार चालविताना त्याने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध भान्याससह वाहतूकीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यत आला असून याच गुन्ह्यांत नंतर त्याला वरळी पोलिसांनी अटक केली.

हा अपघात शनिवारी रात्री उशिरा पावणेदोन वाजता वरळी सी लिंक, उत्तर वाहिनी मार्गावरील सात क्रमाकांवर झाला. प्रभाकर सेना रामोळे हे कल्याणच्या खडकपाडा, गंधारीनगरचे रहिवाशी असून वरळी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी रात्रपाळीवर हजर झाल्यानंतर ते त्यांच्या सहकार्‍यासोबत परिसरात गस्त घालत होते. रात्री पावणेदोन वाजता सी लिंक रोडवर अपघात झाल्याची माहिती प्राप्त होताच प्रभाकर रामोळे हे त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पिलाणे, पोलीस शिपाई बनसोड, चालक पोलीस शिपाई गोफणे यांच्यासोबत घटनास्थळी रवाना झाले होतै. तिथे गेल्यानंतर पोलिसांना एक कार डिवायडर आदळून पलटी झाल्याचे दिसून आली. अपघातग्रस्त कारजवळ हेतल रामजियानी हा उभा होता तर त्याचे दोन मित्र पार्थ लिंबानी आणि नरेशकुमार पोकार यांना रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

प्राथमिक तपासात हेमल रामजियानी हा व्यापारी असून तो सध्या घाटकोपर येथील एलबीएस रोड, गंगावाडीच्या रंभा टॉवरमध्ये राहतो. पाि आणि नरेशकुमार हे दोघेही गुजरातच्या कच्छ, बिधडा उमीयानगर आणि कुकानीनगरचे रहिवाशी आहेत. शनिवारी ते तिघेही हाजीअली येथून घाटकोपरच्या दिशेने वरळी सी लिंकवरुन जात होते. यावेळी हेतल हा कार चालवत होता. ही कार उत्तर वहिनी मार्गावरुन सात क्रमांकावर आल्यानंतर हेतलचा कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने कारची धडक डिवायडरला दिली. या अपघातात हेतलसह इतर दोघांना किरकोळ दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर एका खाजगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते.

अपघातामुळे वरळी सी लिंकच्या वाहतूकीवर परिणाम झाला होता. त्यामुळे क्रेनच्या सहाय्याने कार बाजूला करुन वाहतूक सेवा सुरळीत करण्यात आली होती. तपासात हेतल रामजियानीने मद्यप्राशन केले होते. मद्यप्राशन करुन त्याने कार चालवून हा अपघात घडवून आणला होता. हा प्रकार उघडकीस येताच त्याच्याविरुद्ध मद्यप्राशन करुन भरवेगात कार चालवून स्वतसह इतर दोन मित्रांच्या जिवाच्या धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page