मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 एप्रिल 2025
मुंबई, – मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवून एका तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच शेजारी राहणार्या तरुणाने लैगिंक अत्याचार केल्याची घटना चेंबूर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी तरुणाला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
35 वर्षांची तक्रारदार महिलाविरार परिसरात राहत असून पिडीत तिची तेरा वर्षांची मुगली आहे. शुक्रवारी 4 एप्रिलला रात्री साडेनऊ वाजता तिची तेरा वर्षांची मुलगी त्यांच्याच शेजारी राहणार्या महिलेकडे मिक्सर देण्यासाठी आली होती. यावेळी या महिलेच्या मुलाने पिडीत मुलीला खालच्या रुममध्ये बोलाविले आणि तिथे तिला मोबाईलवरुन अश्लील व्हिडीओ दाखविले होते. त्यानंतर त्याने तिच्याशी जवळीक साधून तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार पिडीत मुलीकडून तिच्या आईला समजताच तिने टिळकनगर पोलिसांना ही माहिती दिली. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत आरोपीला पोलिसांनी अटक केली.
शिक्षकाकडून विद्यार्थ्यावर अनैसगिक लैगिंक अत्याचार
ही घटना ताजी असताना शनिवारी एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर त्याच्याच खाजगी शिकवणी घेणार्या शिक्षकाने अनैसगिक लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन 24 वर्षाच्या शिक्षकाला अटक केली. पिडीत मुलगा कुर्ला येथे राहत असून तो आरोपीकडे खाजगी शिकवणीसाठी जातो. मार्च 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत त्याने पिडीत मुलाला अभ्यास तसेच त्याच्या घरी झोपण्यासाठी बोलावून त्याचे काही अश्लील फोटो काढले होते. ते फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने त्याच्यासोबत अनेकदा अनैसगिंक लैगिंक अत्याचार केला होता. तसेच नकार दिल्यानंतर त्याला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. या अत्याचाराला कंटाळून त्याने घाटकोपर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी शिक्षकाविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी अनैसगिंक लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी शिक्षकाला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.