आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांगलादेशी नागरिकाला अटक
बोगस भारतीय पासपोर्टवर विदेशात प्रवास केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2025
मुंबई, – आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका 30 वर्षांच्या बांगलादेशी नागरिकाला सहार पोलिसांनी अटक केली. मोहम्मद युसूफ मोहम्मद अमजद मंडल असे या नागरिकाचे नाव असून त्याने बोगस भारतीय पासपोर्टवर दुबई आणि ओमान देशात प्रवास केल्याचे उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
सतीशकुमार छाजू राम हे विरार येथे राहत असून इमिग्रेशन अधिकारी म्हणून काम करतात. सध्या त्यांची ड्यूटी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. सोमवारी 14 एप्रिलला ते दिवसपाळीवर कर्तव्य बजावत होते. याच दरम्यान तिथे बांगलादेशात जाण्यासाठी एक प्रवाशी आला होता. तचे नाव मोहम्मद युसूफ होते. त्याच्या पासपोर्टवर बांगलादेशचा व्हिसा होता. त्यावरुन तो अनेकदा बांगलादेशात गेल्याचे उघडकीस आले. याबाबत त्याला विचारणा करणयात आली असता त्याला उत्तरे देता आले नाही. त्यानंतर त्याला चौकशीसाठ ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरमन त्याने तो बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली देताना त्यांना बांगलादेशातील काही कागदपत्रे दाखविली होती. काही वर्षांपूर्वी तो बांगलादेशातून भारतातआला होता. काही वर्ष कोलकाता, मुंबई आणि पुणे येथे जेवण बनविण्याचे काम केले. 2014 साली त्याने एका व्यक्तीच्या मदतीने पॅनकार्ड, आधारकार्ड बनवून त्याद्वारे पासपोर्ट कार्यालयात अर्ज केला होता. त्यानंतर त्याला भारतीय पासपोर्ट मिळाले होते. त्यानंतर तो दुबई आणि ओमान देशात नोकरीसाठी गेला होता. तिथे काही वर्ष काम केल्यांनतर तो ऑक्टोंबर 2018 साली पुन्हा भारतात आला होता.
बोगस भारतीय दस्तावेजाच्या मदतीने त्याने भारतीय पासपोर्टवर दुबई, ओमान देशात प्रवास केला होता. त्यामुळे त्याला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याप्रकरणी सतीशकुमार यांच्या तक्रारीवरुन मोहम्मद युसूफविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेजाच्या मदतीने फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला बोगस पॅनकार्ड, आधारकार्डसह इतर भारतीय दस्तावेज बनविण्यास कोणी मदत केली याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.