केवायसी अपडेटच्या बहाण्याने वयोवृद्ध आजीची फसवणुक
घाटकोपर येथील घटना; विवाहीत नातीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ मार्च २०२४
मुंबई, – वयोवृद्ध आजीचा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्याच नातीने केवायसी अपडेटच्या बहाण्याने विविध फॉर्मवर स्वाक्षरी घेऊन पीएफच्या सुमारे पावणेदहा लाखांची फसवणुक केल्याची धक्कादायक प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पूनम प्रदीप भंडारी या आरोपी नातीविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांत तिला अद्याप अटक झाली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खष्टीदेवी पानसिंग भाकुनी ही ९४ वर्षांची वयोवृद्ध महिला तिच्या कुटुंबियांसोबत घाटकोपरच्या गोविंद नगरात राहते. तिचा वयोवृद्ध मुलगा रमेश हा खाजगी क्लासेस घेत असून त्यातून त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. तिच्या हरिश आणि मोहन या दोन मुलांचे २०२१ आणि २०१७ साली निधन झाले असून ती सध्या तिचा रमेश या मुलासोबत राहते. पूनम ही तिची नात असून तिचा मोठा मुलगा हरिशची विवाहीत मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी पूनमने तिला तिच्या बँक खात्याचे केवायसी अपडेट करायचे आहे. त्यामुळे तिला तिच्यासोबत बँकेत यावे लागेल असे सांगितले. तिच्यावर विश्वस ठेवून ३० डिसेंबर २०२० रोजी ती तिच्योबत घाटकोपर येथील बँकेत गेली होती. तिने केवायसी फॉर्म भरुन तिची स्वाक्षरी घेतली होती. यावेळी तिने तिच्याकडून अन्य दोन फॉर्मवर स्वाक्षरी घेतली होती. ते फॉर्म सादर करताना तिला बँक अधिकार्यांनी तुम्ही कुठले फॉर्म भरुन दिले आहेत याची माहिती आहे ना असे विचारणा केली होती. यावेळी तिने होकार दिा होता.
फेब्रुवारी २०२१ रोजी तिला उत्तराखंड येथे जायचे होते. यावेळी तिने तिचा मोठा मुलगा हरिशकडे पैशांची मागणी केली होती. मात्र त्याने तिला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे तिने रमेशला बँकेत पाठवून तिला पैसे आणून देण्यास सांगितले. त्यामुळे रमेश हा बँकेत गेला होता. त्याने बँक स्टेटमेंट काढल्यानंतर त्याला पावणेदहा लाख रुपयांचे तीन एफडी रमेशच्या बँक खात्यात जमा झाल्याचे दिसून आले. ही रक्कम नंतर पूनमने स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. घरी आल्यानंतर तिला रमेशकडून पूनमने तिच्या बँक खात्यातून पावणेदहा लाख रुपये काढल्याची माहिती समजली होती. यावेळी पूनम त्यांच्या घरी होती. तिने पैसे काढल्याची कबुली देताना ही रक्कम परत तिला परत करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत तिने तिचे पैसे परत केले नाही.
तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन केवायसी अपडेटच्या नावाने नातीनेच पावणेदहा लाखांचा अपहार करुन तिची फसवणुक केली होती. त्यामुळे तिने घडलेला प्रकार घाटकोपर पोलिसांना सांगून तिची नात पूनम भंडारीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पूनमविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच पूनमची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर तिच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.