बोगस कागदपत्रे सादर करुन शासनाला 4.69 कोटीना गंडा

राज्यकर अधिकार्‍याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 एप्रिल 2025
मुंबई, – बोगस कागदपत्रांच्या आधारे जीएसटीसाठी अर्ज करुन शासनाची 4 कोटी 69 लाख रुपयांची फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या आर्थिक घोटाळ्यात राज्यकर अधिकारी गजानन कृष्णा लाड यांचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या संभाव्य सहकार्‍याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी भष्ट्राचार प्रतिबंधक तसेच भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

गजानन लाड हे राज्यकर अधिकारी असून त्यांच्याकडून कुर्ला, घाटकोपर तसेच माझगाव विभागाचा पदभार होता. त्यांच्या कालावधीत मेसर्च इंटरस्क्रीब मार्केट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणाची बोगस आणि खोटे कागदपत्रे तयार करुन जीएसटीएन प्राप्त केला होता. या कंपनीने शासनाला कोणताही कर भरला नव्हता. तरीही कंपनीच्या वतीने जीएसटीसाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जात कंपनीने त्यांना 4 कोटी 69 लाख 29 हजार 630 रुपयांचा जीएसटी येणे बाकी असल्याचे नमूद केले होते. या अर्जाची गजानन लाड यांच्याकडून शहानिशा करणे गरजेचे होते.

मात्र त्याची कुठलीही शहानिशा न करता त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन हा अर्ज मंजूर केला होता. याकामी त्यांनी कंपनीच्या अधिकार्‍यांनी संगनमत करुन त्यांच्या जीएसटीची रक्कम पास करुन घेतली होती. त्यांच्या बोगस अहवालामुळे कंपनीला संंबंधित रक्कमेचा जीएसटी देण्यात आला होता. ही कंपनी जीएसटीसाठी पात्र नसताना केवळ बोगस कागपत्रांच्या आधारे कंपनीने गजानन लाड यांच्या मदतीने ही रक्कम पास करुन घेतली होती. अशा प्रकारे कंपनीसह गजानन लाड यांनी शासनाची फसवणुक तसेच आर्थिक हानी केली होती. हा प्रकार नंतर ऑडिटदरम्यान उघडकीस आला होता. त्यानतर राज्य विक्रीकर विभागाकडून मुंबई युनिट लाचलचुचपत प्रतिबंधक तक्रार करण्यात आली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गजानन लाड यांनीच कंपनीच्या बोगस अधिकार्‍यांनी संगमनत करुन हा आर्थिक घोटाळा केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकार उघडकीस येताच त्याच्याविरुद्ध कलम 7, 12, 13 (1), (अ), सहकलम 13 (2) लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 1988 सहकलम 109, 403, 409, 420, 465, 467, 468, 471, 477 (अ) भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांत गजानन लाडला इतर कोणी अधिकारी किंवा कर्मचार्‍यांची मदत केली होती. फसवणुकीची रक्कम त्यांना किती मिळाली, या रक्कमेचा त्यांनी काय केले याचा तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page