बस प्रवासादरम्यान तरुणीचा विनयभंग करणारा गजाआड

गुन्हे शाखेची कारवाई; आरोपीचा ताबा वरळी पोलिसांकडे

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 एप्रिल 2025
मुंबई, – बस प्रवासादरम्यान तरुणीचा विनयभंग करणार्‍या आरोपीला गजाआड करण्यात गुन्हे शाखेला यश आले. इरफान हुसैन शेख असे या 31 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी वरळी पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

गुरुवार 10 एप्रिल बळीत तरुणी ही प्रभादेवी ते कुरणे चौक असा बसने प्रवास करत होती. यावेळी तिच्या मागे एक तरुण उभा होता. अनेकदा तो तिच्या मागून अश्लील स्पर्श करुन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले, तरीही तो तिचा विनयभंग करत होता. गोपाळनगर बसस्टॉप आल्यानंतर ती बसमधून उतरुन निघून गेली. या घटनेनंतर तिने वरळी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरु केला होता. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते.

प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, पोलीस निरीक्षक धराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार देवार्डे, विकास चव्हाण, भास्कर गायकवाड यांनी तक्रारदार तरुणी ज्या बसमधून प्रवास करत होती, त्या बसमधील प्रभादेवी ते कुरणे चौकादरम्यानचे सीसीटिव्ही फुटेज तपासले होते. या फुटेजवरुन तो तरुण वरळी दूरदर्शन येथे बसमधून उतरल्याचे दिसून आले. त्यानंतर या परिसरातील 25 हून अधिक सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करुन पोलीस पथक एका खाजगी कंपनीत गेले होते. याच कंपनीत काम करणार्‍या इरफान शेख याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशी त्यानेच तक्रारदार तरुणीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले. त्याला त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी वरळी पोलिसांकडे सोपविण्यात आले. इरफान हा वांद्रे येथील खेरवाडी, नळवाली गल्ली परिसरात राहत असून वरळीतील एका खाजगी कंपनीत कामाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

तेरा वर्षांच्या विद्यार्थिनीचा सफाई कर्मचार्‍याकडून विनयभंग
दुसर्‍या घटनेत एका तेरा वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा शाळेच्याच सफाई कर्मचार्‍याने विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी 36 वर्षांच्या सफाई कर्मचार्‍याविरुद्ध बोरिवली पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीनंतर आरोपी सफाई कर्मचार्‍याविरुद्ध अटकेची कारवाई होणार आहे. दरम्यान बुधवारी उघडकीस आलेल्या या घटनेने शाळेतील शिक्षकासह पालक आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. बळीत मुलगी ही तेरा वर्षांची असून ती बोरिवलीतील एका शाळेत शिकते. शुक्रवारी 11 एप्रिलला सकाळी दहा वाजता ती तिच्या मैत्रिणीसोबत चौथ्या मजल्यावर आठव्या इयत्तेच्या अ वर्गाबाहेर उभी होती. यावेळी तिथे शाळेचा सफाई कर्मचारी सफाईचे काम करत होता. यावेळी त्याने तिथे उभी असलेल्या बळीत मुलीशी अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिने सुरुवातीला कोणालाही सांगितला नव्हता. नंतर तिने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला होता. ही माहिती ऐकून त्यांना धक्काच बसला होता. त्यानंतर त्यांनी शाळेत सफाई कर्मचार्‍याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शाळा प्रशासनाने गंभीर दखल घेत बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपी सफाई कर्मचार्‍याविरुद्ध पोलिसांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page