शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने पाचजणांची फसवणुक

96 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 एपिल 2025
मुंबई, – शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका व्यावसायिकासह त्याच्या चार मित्रांची सुमारे 96 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार गावदेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रज्वल प्रमित शहा या आरोपी मित्राविरुद्ध गावदेवी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रज्वलने शेअरमार्केटच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नॉटरिगा इंजिनिअर हे भोईवाडा परिसरात राहत असून त्यांचा स्वतचा व्यवसाय आहे. 2018 रोजी ग्रँटरोड येथे वर्ल्ड ऑफ गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संगणक गेम स्पर्धेददम्यान त्यांची प्रज्वल शहाशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. अनेकदा गेम खेळण्यासाठी ते भेटत होते. याच दरम्यान प्रज्वलने त्यांच्याकडे अनेकदा उसने पैसे मागितले होते, मात्र प्रत्येक वेळेस तो पैसे परत करत असल्याने त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला होता. चौकशीदरम्यान त्याने त्याच्यासह त्याचे वडिल शेअरमार्केटमध्ये काम करत असल्याचे सांगितले. शेअरमार्केटमध्ये त्यांनी अनेकांचे पैसे गुंतवणूक केली असून त्यांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. त्यामुळे त्याच्यासह त्याच्या मित्रांनी शेअरमध्ये गुंतवणुक करावी.

या गुंतवणुकीवर त्यांना पाच ते दहा टक्के टक्के व्याज मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्याने त्यांना एका आकर्षक योजनेची माहिती सांगितली होती. ही योजना चांगली होती, त्यामुळे नॉटरिगा यांनी त्यांच्या काही मित्रांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासह त्याचे चार मित्र कैवान पंथकी, विरल पटेल, निशान चौरसिया आणि केतन परमार यांनी प्रज्वल शहाकडे शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी काही रक्कम दिली होती. या गुंतवणुकीवर त्यांना व्याजासहीत पैसे परत केले होते. त्यामुळे त्याच्यावर त्यांचा विश्वास निर्माण झाला होता. त्यानंतर त्याच्याकडे डिसेंबर 2020 पर्यंत सुमारे 91 लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र ही रक्कम गुंतवणुक केल्यानंतर त्याने रिटर्न देणे बंद केले होते. त्यामुळे नॉटरिगासह त्याच्या इतर चार मित्रांनी त्याच्याकडे विचारणा करुन गुंतवणुक केलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने त्यांच्याकडे काही दिवसांची मुदत मागून घेतली होती,

मात्र दिलेल्या मुदतीत त्यांना पैसे दिले नाही. त्याच्या घरी गेल्यानतर प्रज्वलच्या वडिलांनी त्यांच्या पत्नीला कॅन्सर झाला आहे. तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याने त्यांच्याकडे आणखीन वीस लाखांची मागणी केली होती. आधीचे 91 लाख आणि आता वीस लाखांची मागणी करुन त्यांनी त्यांना 19 लाख रुपये व्याज म्हणून देण्याचे म्हणजे काही दिवसांत 1 कोटी 30 लाख रुपये देण्याचे आश्वाासन दिले होते. त्यामुळे नॉटरिगाने त्यांना वीस लाख रुपये दिले होते. या पेमेटनंतर प्रज्वल व त्याच्या वडिलांनी त्यांना 98 लाख आणि 32 लाख रुपयांचे दोन धनादेश दिले होते. डिसेंबर 2021 त्यापैकी 32 लाखांचा धनादेश त्यांनी बँकेत जमा केला होता, मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला.

याबाबत विचारणा करण्यासाठी त्यांनी प्रज्वल आणि त्याचे वडिल प्रमित शहा यांना कॉल केला होता, मात्र त्यांनी त्यांचे कॉल घेतले नाही. काही दिवसांनी त्यांनी काही रक्कम परत केली, मात्र उर्वरित 96 लाखांचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. या घटनेनंतर त्यांनी गावदेवी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून प्रज्वल शहा याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून प्रज्वलची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page