मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचार्‍यांची संयुक्त जयंती साजरी

उच्च व सत्र न्यायालय क्रिकेट संघाचा सन्मानचिन्हे देऊन सत्कार

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 एपिल 2025
मुंबई, – मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संयुक्त जयंती उत्सव समिती आयोजित छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती गुरुवारी 24 एप्रिलला प्रेरणा हॉल, पोलीस क्लब, मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात मोठ्या उत्साहात साजरी झाली.

या क्रार्यक्रमांत न्या. श्रीराम मोडक, न्या. डॉ. निला गोखले, न्या. जितेंद्र जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महानगर दंडाधिकारी न्यायालयीन मुख्य न्या. शेख यांच्यासह इतर पीठासीन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष नागेश गिरगावकर, सरचिटणीस विनोद पाथरकर, बृहन्मुंबई विभागातील न्यायालयातील प्रशासकीय अधिकारी, उच्च न्यायालय, शहर दिवाणी, सत्र आणि लघुवाद न्यायालयातील सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पहलगाम दशहतवादी हल्ल्याचा निषेध करुन दोन मिनिट मौन व्यक्त करुन श्रद्धाजंली अर्पित करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयुक्त जयंती उत्सव समितीचे सचिव संजय शेलार यांनी केली. यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी न्यायमूर्तींचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मान केला. कार्याध्यक्ष शरद साळवे यांनी कार्यक्रमांचे प्रस्ताविक केले, कवि कुसुमग्रजांच्या निर्धार या कवितेतून महापुरुषांच्या कार्याचा गुणगौरव सुरु केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून निवड झालेल्या कुमारी प्राची हिचा न्यायमूर्तींच्या हस्ते सत्कार करण्यता आला. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांनी महापुरुषांबद्दल विचार व्यक्त करताना प्रमुख न्या. डॉ. निला गोखले यांनी महिला सबलीकरणात महापुरुषांचे योगदान अधोरेखीत करुन, महात्मा फुले दांपत्यांच्या कार्याचा गौरव केला. महापुरुषांच्या कार्यामुळेच आपण उच्च न्यायालयात कार्यरत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. न्या. शिवकुमार दिगे यांनी आापले खुमकदार शैलित भाषण करुन न्या. मोडक साहेबांचे विचार ऐकणार असल्याचे सांगून भाषण आटोपशीर केले.

न्या. श्रीराम मोडक यांनी आपल्या भाषणात रंगत आणली. महापुरुषांच्या कार्याचा गौरव करताना तिन्ही महापुरुषांचा कालखंडाचा ऊहापोह केला. स्वातंत्र आणि पारतंत्र्याच्या कालावधी पोटतिडकीने मांडला. संपूर्ण सभागृह आपले गगनभेदी आवाजाने मंत्रमुग्ध करुन टाकले. राज्य घटनेची विवधितेतून एकात्मक विशाद केली. आपल्या सोबतच स्वतंत्र झालेल्या शेजारील राष्ट्रे रसातळास जात असताना भारतीय राज्यघटनेत 75 वा अमृत महोत्सव साजरा करत आहे असे सांगून महापुरुषांचा कार्याला मानवंदना दिली.

संयुक्त जयंती उत्सव समितीने 31 मार्च 2025 रोजी मुंबई पोलीस जिमखाना येथे बृहन्मुंबई न्यायालयीन कर्मचारी संघाचे क्रिकेट सामने आयोजित केले होते. या कार्यक्रमांत क्रिकेटवीरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रथम पारितोषिक उच्च न्यायालय क्रिकेट संघाला तर द्वितीय पारितोषिक शहर आणि जिल्हा सत्र न्यायालय क्रिकेट संघाला न्यायमूर्तींच्या हस्ते संयुक्तरीत्या प्रदान करण्यात आले. संयुक्त जयंती, क्रिकेट सामने तसेच इतर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चंद्रकांत बनकर यांचा नेहमीच महत्त्वाचा योगदान असल्याने या कार्यक्रमांत समितीचे सल्लागार चंद्रकांत बनकर यांचे समितीच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. चंद्रकांत बनकर यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page