सात वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अनैसगिंक लैगिंक अत्याचार
शेजारी राहणार्या 35 वर्षांच्या आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 मे 2025
मुंबई, – सात वर्षांच्या अल्पवयीन मुलावर त्याच्याख शेजारी राहणार्या 35 वर्षांच्या आरोपीने अनैसगिंक लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार सांताक्रुज परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनैसगिक लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस सांताक्रुज पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. खेळण्यासाठी मोबाईल देतो असे सांगून आरोपीने मुलावर अत्याचा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
ही घटना रविारी सकाळी साडेनऊ वाजता सांताक्रुुज परिसरात घडली. याच परिसरात तक्रारदार आणि आरोपी शेजारी राहतात. त्यामुळे ते एकमेकांच्या परिचित आहेत. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता तक्रारदाराचा मुलगा घरासमोरच बसला होता. यावेळी तिथे आरोपी तिथे आला. त्याने बळीत मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देतो असे सांगून त्याच्या घरी आणले. घरी गेल्यानंतर त्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. काही वेळानंतर त्याने त्याच्यासोबत अनैसंगिक लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगून त्याने त्याला घरी पाठविले होते. या घटनेनंतर त्याला प्रचंड वेदना होऊ लागले होते, त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याची विचारपूस केली असता त्यांना त्यांच्या मुलाकडून घडलेला प्रकार समजला होता.
ही माहिती ऐकून त्यांना धक्काच बसला होता. त्यानंतर त्यांनी सांताक्रुज पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध अनैसैगिंक लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच 35 वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.