समन्सनंतर एजाज खानवर विनयभंगासह लैगिंक अत्याचाराचा गुन्हा
अश्लील दृष्य दाखविणे व लग्नाचे आमिष दाखविणे महागात पडणार
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 मे 2025
मुंबई, – ओटीटी प्लेटफॉमच्या उल्लू अॅप्सवर अश्लील दृष्य दाखविल्याप्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स आंबोली पोलिसांकडून बजाविण्यात आल्याची घटना ताजी असताना अभिनेता एजाज खान याच्याविरुद्ध चारकोप पोलिसांनी विनयभंगासह लैगिंक अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याची चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. त्यामुळे अश्लील दृष्ये दाखविणे आणि लग्नाचे आमिष दाखवून एका अभिनेत्रीवर लैगिंक अत्याचार करणे एजाज खानला चांगलेच महागात पडणार आहे.
एजाज हा अभिनेता असून सध्या जोगेश्वरीतील एस. व्ही रोड, लोढा बेल, एअर पटेल इस्टेट रोड परिसरात राहतो. बीग बॉस सिझन सातनंतर तो चांगलाच प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर तो सतत कुठल्या न कुठल्या वादग्रस्त विधनानंतर वादाच्या भोवर्यात सापडला होता. अलीकडेच ओटीटी प्लेटफॉर्मवर उल्लू अॅप्सवर एक कार्यक्रमात तो होस्ट म्हणून काम करत होता. या अप्सवर अश्लील दृष्य दाखविल्याप्रकरणी त्याच्यासह मालिकेच्या निर्माता आणि इतरांविरुद्ध आंबोली पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे संबंधित सर्वांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पोलिसांकडून पाठविण्यात आले होते.
ही घटना ताजी असताना एका अभिनेत्रीवर एजाज खानवर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर विनयभंगासह लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. तिच्या तक्रार अर्जावरुन रविवारी एजाज खान याच्याविरुद्ध पोलिसांनी (64), 64 (2), (ऊ), 69, 74 भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 30 वर्षांची ही पिडीत तरुणी अभिनेत्री असून कांदिवलीतील चारकोप परिसरात राहते. एका कार्यक्रमांत तिची एजाज खानशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्याने तिच्याशी जवळीक साधून तिला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. तिला विविध शोमध्ये काम देण्याचे, या शोमध्ये पूर्ण स्वातंत्र्य देण्याचे तसेच तिच्या बहिणीच्या लग्नाचा खर्च करण्याचे आश्वासन दिले होते. याच दरम्यान त्याने तिच्या राहत्या घरी तिच्याशी अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. मात्र एजाजने त्याचे आश्वासन न पाळता तिची फसवणुक केली होती.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने एजाजविरुद्ध चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानतर एजाजविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांची त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीनंतर त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आधी चौकशीचे समन्स आणि आता एका अभिनेत्रीच्या तक्रारीवरुन विनयभंगासह लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने एजाज खानच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. यापूर्वी त्याला ड्रग्जच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या जामिनावर बाहेर आहे.