चोरीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या पती-पत्नीला अटक
विविध शहरात खरेदीच्या नावाने चोरी केल्याचे उघडकीस
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 मे 2025
मुंबई, – कपडे खरेदी करण्याचा बहाणा करुन शोरुममध्ये प्रवेश करुन कॅश काऊंटरमधील कॅश चोरी करणार्या एका टोळीचा खार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत आरोपी पती-पत्नी पोलिसांनीी अटक केली असून त्यांच्या अटकेने अलीकडेच झालेल्या चार चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. मिलन बैजू वाथियाथ आणि अतुल्य मिल वाथियाथ अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे केरळचे रहिवाशी आहेत. या दोघांनी विविध शहरात खरेदीच्या नावाने कपड्याच्या दुकानातील कॅश काऊंटरमधील ड्राव्हरमधील पैशांची केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तेजश्री सुरेश आंबरेकर ही महिला डोबिंवलीची रहिवाशी असून सध्या खार येथील लिंक रोडवरील बिबा शोरुममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कामाला आहे. गुरुवारी 1 मेला सकाळी दहा वाजता ती तिच्या सहकारी कर्मचार्यासोबत शोरुममध्ये आी होती. सकाळी पावणेअकरा वाजता शोरुममध्ये एक जोडपे कपडे खरेदीसाठी आले होते. त्यांना कपडे दाखविण्यात व्यस्त असताना या जोडप्याने त्यांच्या कॅश काऊंटरमधील सुमारे 53 हजाराची कॅश चोरी चोरी केले होते. कपडे पसंद पडले नसल्याचे सांगून ते दोघेही निघून गेले होते. काही वेळानंतर तेजश्रीने कॅश काऊंटरची पाहणी केली असता कॅश काऊंटरच्या ड्राव्हरमधून 53 हजार 500 रुपयांची कॅश चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तिने शोरुममधील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. यावेळी तिला कपडे खरेदीच्या बहाण्याने शोरुममध्ये आलेल्या या जोडप्यानेच तिची दिशाभूल करुन कॅश काऊंटरमधील कॅश चोरी केल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने घडलेला प्रकार खार पोलिसांना सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच खार पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन संबंधित जोडपे गोरेगाव येथील ओबेरॉय मॉलमध्ये अशाच प्रकारे चोरीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस निरीक्षक वैभव गडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कुंबरे, पोलीस हवालदार दिनेश शिर्के, पोलीस शिपाई कुंतन कदम, महेश लहमागे, विशाल भामरे, सुमीत अहिवळे, मनोज हांडके यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या मिलन आणि अतुल्य वाथिवाथ या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच ही चोरी केल्याची कबुली दिली.
चौकशीत ते दोघेही केरळच्या त्रिशुर, मानकोडी पोस्ट ऑफिस, वाथिया परिसरातील रहिवाशी असल्याचे उघडकीस आले. विविध मॉलमध्ये खरेदीच्या नावाने चोरी करणारे ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या दोघांनी अशाच प्रकारे पनवेल, एनआर चक्री, गोरखपूर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात चोरी करुन पलायन केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या अटकेने चोरीच्या चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. ते दोघेही पती-पत्नी असून रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. ते वेगवेगळ्या राज्यातील मोठ्या कपड्याच्या दुकानात कपडे खरेदीसाठी जातात, त्यानंतर दुकानातील कर्मचार्यांशी गप्पा मारुन त्यांचे लक्ष विचलित करुन दुकानातील ड्राव्हरमधील कॅश चोरी करुन पळून जात होते. या दोघांना मुंबईसह दिल्ली, भोपाळ, चेन्नई, जबलपूर, पॉडिचेरी, बंगलोर, पनवेल, कल्याण, नागपूर, नाशिक आणि ठाणे शहरात अशाच प्रकारे चोरी केल्याचे पोलिसांनाा सांगितले. त्यांच्या अटकेने अशाच चोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.