मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 मे 2025
मुंबई, – मुंबई शहरात पवई, ओशिवरा आणि दादर परिसरात गेल्या दोन दिवसांत मुंबई पोलिसांच्या अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी कारवाई करुन तीन ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. या तिन्ही आरोपींकडून पोलिसांनी 108 ग्रॅम वजनाचे एमडी आणि 5 किलो 59 ग्रॅम वजनाचे उच्चप्रतीचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला आहे. या ड्रग्जची आंतराराष्ट्रीय बाजारात किंमत 8 कोटी 80 लाख रुपये इतकी किंमत आहेत. तिन्ही आरोपीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांच्या चौकशीतून इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
गेल्या काही महिन्यांत मुंबई पोलिसांनी ड्रग्ज तस्कराविरोधात विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जसहीत हायड्रोपोनिक गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या आझाद मैदान, वरळी आणि घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या तिन्ही युनिटने संबंधित ड्रग्ज तस्कराच्या अटकेसाठी मोहीम हाती घेतल होती. सोमवारी 5 मेला पवईतील साकिविहार रोडवर आझाद मैदान युनिटच्या अधिकार्यांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना 108 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. या एमडी ड्रग्जची किंमत 21 लाख 60 हजार रुपये इतकी होती. चौकशीत या तस्कराने तो तिथे ड्रग्जची डिलीव्हरीसाठी आल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला अटक करुन पुढील कारवाईसाठी युनिट कार्यालयात आणण्यात आले होते.
दुसर्या कारवाईत घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांनी अंधेरीतील ओशिवरा, लोखंडवाला बॅक रोडवर साध्या वेशात पाळत ठेवून हायडोपोनिक गांजाचा विक्रीसाठी आलेल्या एका ड्रग्ज तस्कराला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 2 किलो 040 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजा जप्त केला असून त्याची किंमत दोन कोटी चार लाख रुपये इतकी आहे. ही कारवाई ताजी असताना वरळी युनिटने दादर येथील दादर कॅटरिंग कॉलेजवळ अशाच एका ड्रग्ज तस्कराला अटक केली होती. त्याच्याकडून या अधिकार्यांनी 3550 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला. त्याची किंमत 3 कोटी 55 लाख रुपये इतकी आहे.
तपासात या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपी तिथे गांजाची विक्रीसाठी आले होते, मात्र गांजा विक्री करण्यापूर्वी या दोघांनाही वरळी आणि घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांनी अटक केली. तिन्ही कारवाईत पोलिसांनी 5 कोटी 80 लाख रुपयांचा 108 ग्रॅम वजनाच्या एमडीसह 5 किलो 590 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर या तिघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने तिघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.