गुप्तवार्ता विभागाच्या सहपोलीस आयुक्त आरती सिंह यांची नियुक्ती

राज्य पोलीस दलातील इतर 26 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 मे 2025
मुंबई, – मुंबई पोलीस दलात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या गुप्तवार्ता विभागाच्या सहपोलीस आयुक्तपदी आरती सिंग यांची गृहविभागाने बदली केली आहे. गुप्तवार्ता विभागाच्या पहिल्याच सहपोलीस आयुक्त बनण्याचा मान आरती सिंग यांना मिळाला आहे. त्यांच्यासह राज्य पोलीस दलातील इतर 26 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात अमरावतीच्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक नऊचे समादेशक राकेश कलासागर यांची मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तपदी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

देवेन भारती यांची पोलीस आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर विशेष पोलीस आयुक्तप रिक्त होते. अतिरिक्त पोलीस महासंचालक पदाचे संबंधित पद विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून अवनत करण्यात आले आहे. त्या जागी आता सहपोलीस आयुक्त गुप्तवार्ता या पद निर्माण करण्यात आले आहे. याच पदासाठी बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या आयपीएस अधिकारी आरती सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापदी नियुक्त होणार्‍या त्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी असल्याने शहरातील गुप्तवार्ता यंत्रणा बळकट करणे, प्राप्त गुप्तवार्ताचे निरंतर सूक्ष्ण पर्यवेक्षण करणे आवश्यक आहे. त्यात मुंबई शहरात अनेक महत्त्वाचे स्थळ असल्याने त्यात अ वर्गवारीत महत्त्वाच्या स्थळांची संख्याही मोठी आहे. मुंबई शहरात असलेला संभाव्य धोका पाहता, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची संख्या जास्त आहे. भारताचे आणि इतर राष्ट्रांचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राष्ट्रप्रमुख, राजे आदी देशातील इतर महत्त्वाचे केंद्रीय मंत्री मुंबई शहरात भेटी देतात. अशा वेळेस त्यांच्या प्रवास आणि वास्तव्याची, त्यांच्या सुरक्षेचे बळकटीकरण करणे आणि सूक्ष्म पर्यवेक्षण करणे गरजेचे आहे. त्यामुळे गृहविभाग सहपोलीस आयुक्त गुप्तवार्ता या पदाबाबत विचारधीन होते. अखेर या पदाची नियुक्ती करताना त्या जागी आरती सिंह यांची बदली करण्यात आली आहे.

शुक्रवारी सायंकाळी गृहविभागाचे सहसचिव व्यकंटेश भट यांनी संबंधित पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्याचे आदेश जारी करताना काही पोलीस अधिकार्‍यांना अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बढती दिली आहे. शुक्रवारी बदली करण्यात आलेल्यांमध्ये मध्य प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर यांची मुंबईच्या सुरक्षण आणि सुरक्षा विभाग, पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांची मुंबईख्या गुन्हे शाखेत, वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त एम. रामकुमार यांची पुण्याच्या महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाच्या संचालक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना यांची उत्तर प्रादेशिक विभागात, पुण्याच्या दक्षिण-पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पाटील यांची नागपूर शहर, नागपूर गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय बी पाटील यांची पुणे शहर, पिंपरी-चिंचवड विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांची नागपूर शहर, पुणे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक एस. डी. आव्हाड यांची पिंपरी-पिंचवडच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, नागपूरच्या दक्षिण प्रादेशिक विभागचे अतिरिक्त पोलीस आयुक्त एस. टी राठोड यांची अंमली पदार्थ विरोधी फास्ट फोर्स, नागपूरच्या उत्तर प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पी. पी शेवाळे यांची मुंबई राज्य दशहतवाद विरोधी पथक, पुण्याचे प्रशासन विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त ए. एच चावरिया यांची अमरावती शहर आणि मुंबईच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त विनिता साहू यांची सशस्त्र पोलीस दल- मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे मुंबईच्या मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य प्रसा अक्कानवरु यांची महाराज्य राज्य सुरक्षा महामंडळ, पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांची पुणे शहराच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, मुंबईच्या प्रतिबंध विभागाचे पोलीस उपायुक्त अमोघ गावकर यांची पुण्याच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या प्रशासन विभागाच्या पोलीस महानिरीक्षक, पुण्याच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या प्रशासन विभागाच्या पोलीस महानिरीक्षक जी. श्रीधर यांची पुण्याच्या पोलीस दळणवळण माहिती तंत्रज्ञान आणि परिवहन विभाग, मुंबई राज्य राखीव पोलीस बद क्रमांक आठचे समादेशक मोक्षदा पाटील यांची मुंबईच्या राज्य राखीव पोलीस बलाच्या पोलीस उपमहानिरीक्षक, अमरावतीच्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक नऊचे समादेशक राकेश कलासागर यांची मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त, नागपूरच्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चारच्या समादेशक प्रियंका नाननवरे यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त मुंबई वाहतूक विभाग, राज्याच्या महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या सहसंचालक, नवी मुंबई सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेशकुमार मेंगडे यांची नवी मुंबईच्या सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी (बढती देऊन त्याच ठिकाणी बदली), रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबईच्या विशेष शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, लातूरच्य पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय मगर यांची पुणे राज्य राखीव पोलीस बलाच्या पोलीस उपमहानिरीक्षक, पुणे बिनतारी विभागाचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे यांची पुणे शहराच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने यांची मुंबईच्या मध्य विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, ठाण्याचे नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधिकारी राजेंद्र दाभाडे यांची नागपूरच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page