बेस्ट बसच्या धडक लागून बाईकस्वाराचा मृत्यू

अपघातप्रकरणी आरोपी बसचालकास अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० सप्टेंबर २०२४
मुंबई, – भरवेगात जाणार्‍या एका बेस्ट बसची धडक लागून झालेल्या अपघातात सादिक खान या बाईकस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने बस चालवून एका बाईकस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला नंतर पोलिसांनी अटक केली.

हा अपघात सकाळी सहा ते सव्वासहाच्या सुमारास गोरेगाव येथील युनिट सहाजवळ घडली. सादिक हा गोरेगाव येथील दिडोंशी परिसरात राहत होता. त्याचा पाव डिलीव्हरीचा व्यवसाय होता. मंगळवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे पावाची डिलीव्हरीसाठी त्याच्या बाईकवरुन जात होता. ही बाईक युनिट सहाजवळ येताच गोरेगाव येथून मयुरनगरच्या दिशेने जाणार्‍या एका बेस्ट बसने त्याच्या बाईकला जोरात धडक दिली. या अपघातात सादिक हा गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातात जखमी झालेल्या सादिकला जवळच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी बसचालकाविरुद्ध हलगर्जीपणा गुन्हा दाखल करुन त्याला पोलिसांनी अटक केली. सादिकच्या अपघाती निधनाने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page