सोशल मिडीयावर अश्लील व्हिडीओ व्हायरल करुन मैत्रिणीची बदनामी
आरोपी मित्राला अटक; धडा शिकविण्यासाठी बदनामी केल्याची कबुली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ मे २०२४
मुंबई, – क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणानंतर मैत्री तोडली म्हणून धडा शिकविण्यासाठी मित्रानेच सोशल मिडीयावर बोगस अकाऊंट उघडून अश्लील व्हिडीओ व्हायरल करुन एका २२ वर्षांच्या मैत्रिणीची बदनामी केल्याचा प्रकार विलेपार्ले परिसरात उघडकीस आहे. याप्रकरणी विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताख सुनिल भुत्तो महांतो या २४ वर्षांच्या आरोपी मित्राला जुहू पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्याकडून पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून या मोबाईलरुन त्याने ते अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याचे बोलले जाते.
तक्रारदार तरुणी ही अंधेरी येथे राहत असून जुहू येथे कामाला आहेत. काही महिन्यांपूर्वीच तिची सोशल मिडीयावर सुनिल महांतोशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. अनेकदा ते दोघेही एकमेकांना भेटत होते. त्यातून त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध झाले होते. ते दोघेही एकमेकांचे अनेक गुपित शेअर करत होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर तिने त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकले होते. त्याचा सुनिलच्या मनात प्रचंड राग होता. तिला धडा शिकविण्यासाठी त्याने त्याच्याकडे असलेले असलेले तिचे काही अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केले होते. त्यासाठी त्याने सोशल मिडीयावर एक बोगस अकाऊंट उघडले होते. अलीकडेच हा व्हिडीओ निदर्शनास येताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. सुनिलकडे तिचे अश्लील व्हिडीओ होते, त्यामुळे त्यानेच ते व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी केल्याची तिला खात्री होती. या घटनेनंतर तिने जुहू पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सुनिल महांतोविरुद्ध विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनुराग दिक्षीत यांना दिले होते. हा तपास हाती येताच तांत्रिक माहितीवरुन दोन दिवसांपूर्वी सुनिल महांतो याला पोलीस उपनिरीक्षक अनुराग दिक्षीत, तासगावकर, मांडेकर, कोकीटकर या पथकाने घाटकोपर येथून अटक केली. सुनिल हा मूळचा आसामचा रहिवाशी असून घाटकोपर येथील एका फ्लॅटमध्ये केअरटेकर काम करतो. त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल जप्त केला असून या मोबाईलमध्ये तक्रारदार तरुणीचे काही अश्लील व्हिडीओ असल्याचे उघडकीस आले. तिच्यासोबत झालेल्या भांडणानंतर तिला धडा शिकविण्यासाठी त्याने तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याची कबुली दिली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.