शाळा सोडल्याचा दाखल्यासाठी लाचेची मागणी

मुलुंड नाईट हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिकेला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ जानेवारी २०२५
मुंबई, – शाळा सोडल्याचा दाखल्यासाठी एका व्यक्तीसह त्याच्या जावयाकडे लाचेची मागणी करणे मुलुंड नाईट हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिकेला चांगलेच महागात पडले आहे. एकोणीशे रुपयांची लाचेची मागणी करुन लाचेची ही रक्कम घेताना संगीता शाम गोखले हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर तिला बुधवारी दुपारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.

यातील तक्रारदाराचे चौथीपर्यंत शिक्षण झाले असून त्यांना शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी मुलुंडच्या माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाईट हायस्कूलमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. त्यासाठी त्यांनी शाळेत त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला जमा केला होता. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाला आणि शाळा बंद झाली होती. त्यानंतर कौटुंबिक अडचणीमुळे त्यांना शाळेत जाता आले नव्हते. त्यामुळे त्यांनी शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी शाळेत शाळा सोडल्याचा दाखला मिळावा यासाठी अर्ज केला होता. ४ सप्टेंबर आणि २४ डिसेंबर २०२४ रोजी त्यांनी दोन वेळा शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यासाठी अर्ज केले होते. मात्र या अर्जाबाबत काहीच कारवाई होत नव्हती. त्यामुळे त्यांनी नाईट हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका संगीता गोखले हिची भेट घेतली होती. यावेळी ती त्यांना दाखला देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले. त्यांच्या जावयाने याच शाळेतून शिक्षण घेतले होते. त्यामुळे त्यालाही शाळा सोडल्याचा दाखवा हवा होता.

१३ जानेवारीला ते त्यांच्या मुलगी आणि जावयासोबत पुन्हा शाळेत गेले होते. त्यांनी संगीता गोखले हिची भेट घेतली होती. यावेळी तिने तक्रारदारांना शाळा सोडल्याचा दाखला देण्याासठी साडेसहाशे तर जावयाकडे साडेबारा हजार रुपये द्यावे लागेल असे सांगितले. लाचेची ही रक्कम दिल्याशिवाय दाखला मिळणार नाही याची खात्री होताच त्यांनी लाच देण्याची तयारी दर्शवून तिच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. २१ जानेवारीला तक्रार प्राप्त होताच त्याची संबंधित अधिकार्‍याकडून शहानिशा करण्यात आली होती. यावेळी संगीता गोखले हिने शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी तक्रारदारासह त्यांच्या जावयाकडे १९०० रुपयांची लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त विजय पांचाळ, पोलीस निरीक्षक सुनिता दिघे व अन्य पोलीस पथकाने तिथे सापळा लावला होता. यावेळी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम घेताना संीगात गोखले हिला या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. शाळेत शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिकेवर लाचेच्या गुन्ह्यांत कारवाई झाल्याने तिथे उपस्थित शिक्षकासह विद्यार्थी आणि कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page