कांदिवली-गोरेगाव येथील दोन अपघातात दोघांचा मृत्यू

मृतांमध्ये महिलेसह बाईकस्वाराचा समावेश

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मार्च २०२४
मुंबई, – कांदिवली आणि गोरेगाव येथील दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेसह बाईकस्वाराचा समावेश आहे. अर्चना अजय अंबेकर आणि श्याम श्रीलाल विश्‍वकर्मा अशी या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी बांगुरनगर आणि समतानगर पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद केली. यातील एका गुन्ह्यांत डंपरचालक अमर किसन घायावत याला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली.

पहिला हा अपघात गुरुवारी २५ एप्रिलला दुपारी साडेतीन वाजता गोरेगाव येथील न्यू लिंक रोड, शास्त्रीनगरच्या विबग्योर हायस्कूलसमोर झाला. ६० वर्षांची शारदा मनोहर मोहिते ही महिला सांताक्रुज येथील संभाजी गार्डनजवळील शिवशाही इमारतीमध्ये राहते. मृत अर्चना ही तिची विवाहीत मुलगी असून ती तिच्या बारा वर्षांच्या मुलासोबत गोरेगाव येथील लक्ष्मीनगर, लालमिठी परिसरात राहते. २०१७ साली अर्चनाच्या पतीचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यामुळे ती घरकाम करुन स्वतच्या कुटंबियांचा उदरनिर्वाह चालवत होती. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता ती नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. दुपारी साडेतीन वाजता काम संपल्यानंतर घरी जात होती. यावेळी विबगोर हायस्कूलसमोर रस्ता क्रॉस करताना तिला जोगेश्‍वरीच्या दिशेने जाणार्‍या एका डंपरने जोरात धडक दिली होती. त्यात तिच्या कंबरेसह पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तिला स्थानिक लोकांनी तातडीने ऑस्कर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. आरोपी डंपरचालक अमर किसन घायावत याला लोकांनी पकडून बांगुरनगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. मात्र हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

दुसर्‍या अपघातात श्याम श्रीलाल विश्‍वकर्मा याचा मृत्यू झाला. सिंकदर रामसेवक यादव हा कांदिवलीतील आकुर्ली रोडवर तर मृत श्याम हा हनुमाननगर परिसरात राहत होता. ते दोघेही एकाच शाळेत शिकले होते. त्यामुळे त्यांच्यात चांगले मैत्रीचे संबंध होते. २४ एप्रिलला ते दोघेही त्यांच्या नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी ठाणे येथे गेले होते. तिथे त्यांनी मद्यप्राशन केले होते. रात्री ते दोघेही ठाण्यातून मिरारोड येथे आले. एका बारमध्ये मद्यप्राशन करुन ते त्यांच्या घरी जात होते. यावेळी श्याम हा त्याच्या बाईकवरुन भरवेगात जात होता. यावेळी सिंकदर यादवने त्याला मद्यप्राशन केल्याने बाईक सावकाश चालविण्यास सांगितले. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष करुन बाईक वेगात चालविण्याचा प्रयत्न ेला. ही बाईक गुरुवारी पहाटे सव्वाचार वाजता कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज ब्रिजजवळ येताच त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटले. डिवायडरला बाईकची धडक लागल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला सिंकदरने तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सिंकदरच्या जबानीनंतर पोलिसांनी श्याम विश्‍वकर्माविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page