राज्य पोलीस दलातील 29 एसीपी दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या

गुरुवारी सायंकाळी गृहविभागाकडून बदल्याचे आदेश जारी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 ऑगस्ट 2025
मुंबई, – राज्य पोलीस दलातील 29 हून अधिक एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकार्‍यांच्या गृहविभागाने बदल्याचे आदेश जारी केले आहे. गुरुवारी सायंकाळी गृहविभागाचे सहसचिव व्यकंटेश भट यांनी बदल्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच बदली झालेल्या पोलीस अधिकार्‍यांनी तातडीने त्यांच्या बदल्याच्या ठिकाणी रुजू होऊन वरिष्ठांनी ही माहिती द्यावी असे व्यकंटेश भट यांनी आदेश दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्य पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त- पोलीस उपअधिक्षक दर्जाच्या पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या अपेक्षित होत्या. अखेर त्यातील काही पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्याचे आदेश गुरुवारी सायंकाळी गृहविभागाकडून जारी करण्यात आले आहे. त्यात मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त दौलत आबाजी साळवे यांची पिंपरी-चिंचवड, शशिकिरण बाबासो काशिद यांची अकोला उपविभागीय पोलीस अधिकारी, मनिषा सदाशिव नलावडे यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अप्पर पोलीस उपायुक्त, विजय शंकरलाल जैस्वाल यांची दहशतवाद विरोधी पथक, अजीत राजाराम टिके यांची सातारा ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, फोर्स वनचे पोलीस उपअधिक्षक सुनिल रामदास लाहिगुडे यांची मुंबई, मिरा-भाईंदर-वसई-विरारचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश शंकर माने यांची भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल विलास कोळी यांची गडचिरोली उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोला शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश संजयराव कुलकर्णी यांची अमरावतीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, बुलढाण्याचे माधवराव रावसाहेब गरुड यांची अमरावतीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, रोशन भुजंगराव पंडित यांची नागपूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र रामचंद्र खाडे यांची अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस उपअधिक्षक, रायगड-रोहाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र दौंडकर यांची ठाणे, रविंद्र पांडुरंग चौधर यांची लातूर-चाकूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रशांत पांडुरंग संपते यांची लातूरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पोलीस उपअधिक्षक, बीड-गेवराईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी निरज बाजीराव राजगुरु यांची अहिल्यानगर-शेवगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत नारायण सावंत यांची सातरा-दहिवडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, समीरसिंध द्वारकोजीराव साळवे यांची लातूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, अमरावतीचे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे पोलीस उपअधिक्षक श्रीहरी भानुदास पाटील यांची खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र, मुंबईच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा जीवन कट्टे यांची नवी मुंबई, सुनिल सदाशिव साळुंखे यांची सातारा-वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, निलेश श्रीराम पालवे यांची छत्रपती संभाजीनगर-गंगापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत औंदुबर दिसले यांची दक्षता पथक, पुणे कारागृह व सुधारसेवेच्या पोलीस उपअधिक्षक, छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त रणजीत जगन्नाथ पाटील यांची पिंपरी-चिंचवड, चंदपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांची पिंपरी-चिंचवड, चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर पोपट यादव यांची पिंपरी-चिंचवड, दिलीप देवराव टिपरसे यांची परभणी-गंगाखेडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, शंकर भाऊसाहेब काळे रायगडच्या महाड उपविभागीय पोलीस अधिकारी, निलेश विश्वासराव देशमुख यांची धाराशीव-तुळजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, बजरंग हिंदूराव देसाई यांची मिरा-भाईंदर-वसई-विरार यांची बदली करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page