भोजपुरी अभिनेत्याची सायबर ठगाकडून फसवणुक

शेअर ट्रेडिंगच्या नावाने घातला पावणेनऊ गंडा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 मे 2025
मुंबई, – भोजपुरी अभिनेता सुशील गुलाब सिंग यांची अज्ञात सायबर ठगाने सुमारे पावणेनऊ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअर ट्रेडिंगच्या नावाने गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून हा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी माही व्यास, आकांक्षा गुप्ता, आशी, पराग दिक्षीत, तुषार हिमांशू असे नाव सांगणार्‍या पाच सायबर ठगाविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ते सर्वजण अल्गो ट्रेड इन्वेस्टमेंट कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगत होते. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

सुशील सिंग हे भोजपुरी चित्रपटातील एक नामांकित अभिनेते असून ते गेल्या चार वर्षांपासून गोरेगाव परिसरात त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांसह मालिकांमध्ये काम केले आहेत. फेब्रुवारी महिन्यांत त्यांच्या एका डॉक्टर मित्राने अल्गो ट्रेड इन्वेस्टमेेंट कंपनीविषयी माहिती सांगितली होती. या कंपनीच्या माध्यामतून त्यांनी शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक केली असून त्यात त्यांना चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांनाही कंपनीच्या कर्मचार्‍यांशी बोलून सल्ला घेण्यास सांगितले होते. 6 फेब्रुवारीला त्यांना माही व्यास नावाच्या एका महिलेने कॉल करुन त्यांना शेअर ट्रेडिंगविषयी माहिती दिली. त्यांना शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता.

या गुंतवणुकीवर त्याला चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. तिच्यासह तिच्या इतर चार सहकार्‍यांच्या सांगण्यावरुन त्यांनी टप्याटप्याटने शेअरमध्ये सुमारे पावणेनऊ लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्याला 84 लाखांचा फायदा झाल्याचे दिसून आले. काही दिवसांनी त्याने त्याचे अकाऊंट तपासले असता त्यात त्याला नुकसान झाल्याचे दिसून आले. त्याच्या खात्यात निगेटिव्ह रक्कम दिसत होती. हा प्रकार निदर्शनास येताच त्याने संबंधित सहाजणांना संपर्क साधून याबाबत विचारणा केली होती, मात्र त्यांच्याकडून त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने या सहाजणांनी त्याची फसवणुक केली होती. त्यामुळे त्याने घडलेला प्रकार सांगून बांगूरनगर पोलिसांत त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित सहाही सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून सायबर सेलचे अधिकारी संबंधित बँक खात्याची माहिती काढत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page