सलमान खाननंतर आदित्य रॉय कपूरच्या घरी घुसण्याचा प्रयत्न

गिफ्ट देण्याच्या बहाण्याने घरी प्रवेश केलेल्या महिलेला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 मे 2025
मुंबई, – सिनेअभिनेता खान याच्यानंतर बॉलीवूड अभिनेता आदित्य रॉय कूपर याच्या वांद्रे येथील एका महिलेने प्रवेश करुन घराबाहेर जाण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गजाला झकारिया सिद्धीकी या 47 वर्षांच्या महिलेला खार पोलिसांनी अटक केली असून तिच्याविरुद्ध अनधिकृतपणे घरात प्रवेश केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. गजाला ही मूळची दुबईची रहिवाशी असून गिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिने आदित्य रॉय कूपरच्या घरी प्रवेश केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सलमान खाननंतर आता आदित्य रॉय कपूरच्या घरात झालेल्या जबदस्तीने प्रवेशामुळे बॉलीवूड कलाकारांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

49 वर्षांची संगीता अर्जुन पवार ही खार येथील खारदांडा, साईकृपा निवासमध्ये राहते. गेल्या आठ वर्षांपासून ती सिनेअभिनेता आदित्य रॉय कपूर याच्याकडे घरकाम करते. आदित्य कपूर हा वांद्रे येथील शेरली राजन रोड, रिझवी कॉम्प्लेक्स, पॅसिफिक हाईट्स अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक 1001 मध्ये राहतो. सोमवारी दुपारी एक वाजता संगीता ही नेहमीप्रमाणे कामावर आली होती. यावेळी आदित्य कपूर शूटींगसाठी बाहेर गेला होता. त्यामुळे ती एकटीच घरातील काम करत होती. सायंकाळी सहा वाजता फ्लॅटची बेल वाजली म्हणून तिने दरवाजा उघडला. यावेळी समोर एक महिला उभी होती. तिने आदित्य रॉय कपूर यांचेच घर आहे का अशी विचारणा करुन त्यांचे कपडे आणि गिफ्ट द्यायचे आहे असे सांगून घरात प्रवेश घेतला होता. यावेळी तिने आदित्यने तिला घरी बोलाविल्याचे सांगितले.

काही वेळानंतर आदित्य घरी आला असता तिने ती महिला त्याला भेटण्यासाठी आल्याचे सांगितले. तिला पाहिल्यांनतर त्याने तिला ओळखत नसल्याचे सांगितले. याच दरम्यान या महिलेने त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याने तिला बाहेर जाण्यास सांगितले. या घटनेनंतर संगीताने आदित्यची हाऊस मॅनेजर जयश्री डुंकडू हिला फोनवरुन ही माहिती सांगितल. त्यानंतर तिच्या सांगण्यावरुन आदित्यचे प्रोडेक्शन मॅनेजर श्रृती राव ही तिथे आली आणि तिने त्या महिलेला घराबाहेर जाण्यास सांगितले. मात्र तिने घराबाहेर जाण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.

या प्रकारानंतर तिने पोलिसांना ही माहिती सांगितली. या माहितीनंतर काही वेळानंतर खार पोलिसांचे एक विशेष पथक तिथे आले होते. या पथकाने या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तिचे नाव गजाला सिद्धीकी असल्याचे उघडकीस आले. ती दुबईतील लिवान, कर्मा वाय व्हिजन अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक 603 मध्ये राहते. आदित्य रॉय भेटण्यासाठी ती दुबईहून मुंबईत आली होती. गिफ्ट देण्याचा बहाणा करुन तिने त्याच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश कलेा होता. त्यामुळे तिच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी सिनेअभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एका महिलेसह दोघांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असताना आता आदित्य रॉय कपूरच्या घरी एका महिलेने प्रवेश केल्याने बॉलीवूड कलाकरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page