मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ डिसेंबर २०२४
मुंबई, – वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी चोरी करुन बाईकवरुन पळून गेलेल्या दुकलीस आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली. भौमिक भुपेंद्रभाई त्रिवेदी ऊर्फ लालू आणि जितेंद्रकुमार रमेशभाई काकडिया अशी या दोघांची नावे असून याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत आहे. त्यांच्या अटकेने सोनसाखळीसह इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
अंजली दत्ताराम कांदळकर ही ६० वर्षांची वयोवृद्ध महिला भायखळा येथे राहते. २ डिसेंबरला तिची बहिण आणि मुलगी गावी जाण्यासाठी आले होते. या दोघींना एस. ब्रिज सिग्नलला टॅक्सीमध्ये बसवून ती तिच्या घरी जात होती. यावेळी तिथे एक तरुण आला. काही कळण्यापूर्वीच त्याने तिच्या गळ्यातील तीन तोळ्याची ९८ हजाराची सोन्याच्या किरण मळीची माळ खेचून त्याच्या दुसर्या सहकार्याच्या बाईकवरुन पलायन केले होते. तिने आरडाओरड करुन त्यांचा पाठलाग केला, मात्र ते दोघेही पळून जाण्यात यशस्वी झाले. घडलेला प्रकार आग्रीपाडा पोलिसांना अंजली कांदळकर हिने दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करुन पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी भौमिक त्रिवेदी आणि जितेंद्रकुमार काकडिया दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर या दोघांनाही अटक करुन माझगाव येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.