मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ जुलै २०२४
मुंबई, – बँकॉंकहून आणलेल्या गांजासह एका महिलेस छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाने अटक केली. फिझा जावेद खान असे या महिलेचे नाव असून तिच्याकडून या अधिकार्यांनी ४ किलो ४७३ ग्रॅम वजनाचा उच्च प्रतीचा गांजाचा साठा जप्त केलाअ आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे दोन कोटी इतकी किंमत आहे. फिझाविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत तिला रविवारी दुपारी किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बँकॉकहून येणार्या विमानातून मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने बँकॉकसह इतर देशातून येणार्या प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या बॅगेची तपासणी सुरु केली होती. रविवारी पहाटे फिझा ही महिला बँकांकहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. तिची हालचाल संशयास्पद वाटताच तिला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्या बॅगेची तपाणी केली असता कपड्याच्या आतमध्ये या अधिकार्यांना एक प्लास्टिकची पिशवी सापडली. त्यात तिने गांजा लपवून आणला होता. ४ किलो २७३ ग्रॅम वजनाच्या या गांजाची किंमत सुमारे दोन कोटी रुपये आहे. चौकशीत तिला गांजा बँकॉंक येथे एका व्यक्तीने दिला होता. त्यासाठी तिला काही रक्कम देण्यात आला होता. गांजा ताब्यात घेतल्यानंतर तिच्याविरुद्ध या अधिकार्यांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिला या अधिकार्यांनी अटक केली. अटकेनंतर तिला दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हा गांजा ती कोणाला देणार होती याचा संबंधित अधिकारी तपास करत आहेत.