मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – तीन दिवसांत विविध कारवााईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी आठ प्रवाशांना अटक केली. या प्रवाशांकडून या अधिकार्यांनी ५० कोटी ११ लाखांचे ड्रग्ज, सुमारे ९४ लाखांचे हिरे आणि दिड कोटीचे दोन किलो सोने जप्त केले आहेत. या आठही प्रवाशाविरुद्ध विविध कलामंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पहिल्या कारवाईत पाच प्रवाशांना या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. सर्वजण बँकॉंकहून मुंबईत आले होते. विमानतळाबाहेर जाण्यापूर्वीच या पाचही प्रवाशांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या समानाची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीदरम्यान त्यांच्याकडे ५० किलो ११६ ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक वीड सापडले. या विदेशी हायड्रोपोनिक वीडची किंमत ५० कोटी ११ लाख रुपये इतकी आहेत. या पाचही प्रवाशांनी व्हॅक्यूम सीलबंद पारदर्शक प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये ते ड्रग्ज लपवून आले होते. विमानतळाबाहेर जाण्यापूर्वीच त्याना या अधिकार्यांनी ताब्यात घेतले आणि या ड्रग्ज तस्करीचा त्यांचा प्रयत्न फसला गेला. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले असून याच गुन्ह्यांत पाचही प्रवाशांना या अधिकार्यांनी अटक केली. अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दुसर्या कारवाईत बँकॉकला जाणार्या एका प्रवाशाला या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. हा प्रवासी त्याच्या बॅगेतून हिर्यांची तस्करी करत होता. मात्र त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने शरीरात एक विशिष्ठ पोकळी तयार करुन त्यातून हिरे घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याच्याकडून या अधिकार्यांनी ५५१ कॅरेटचे हिरे जप्त केले असून त्याची किंमत सुमारे ९४ लाख रुपये इतकी आहे. हिर्यांची तस्करीप्रकरणी नंतर त्याला या अधिकार्यांनी अटक केली.
तिसर्या कारवाईत या अधिकार्यांनी दोन प्रवाशांना अटक केली. ते दोघेही रियाध आणि मस्कत येथून आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. यावेळी त्यांच्या बॅगेची तपासणीदरम्यान या अधिकार्यांना दिड कोटीचे सोने सापडले. त्याचे वजन दोन किलो०७३ ग्रॅम इतके असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी ते सोने प्रवाशांच्या ठेवलेल्या स्पॅनर्समध्ये अतिशय हुशारीने तर सोन्यांची धूळ शरीराच्या पोकळीत लपविण्यात आली होती. मात्र त्यांचा सोने तस्करीचा हा प्रयत्न या अधिकार्यांनी हाणून पाडला. अशा प्रकारे २८ जानेवारी ३१ जानेवारी या कालावधीत विविध कारवाईत या अधिकार्यांनी आठ प्रवाशांना अटक करुन त्यांच्याकडून ६२ कोटी ५९ लाखांचे ड्रग्ज, सोने आणि हिर्यांचा साठा जप्त केला आहे.