आंतरराष्ट्रीय विमानतळावर हिरे-सोने तस्करीप्रकरणी तिघांना अटक
कोट्यवधी रुपयांचे हिरे, सोने, विदेशी घड्याळ जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ सप्टेंबर २०२४
मुंबई, – विदेशातून चोरट्य मार्गाने आणलेल्या हिरे-सोने तस्करीचा कस्टम अधिकार्यांनी पर्दाफाश करुन तीन प्रवाशांना अटक केली. या तिन्ही प्रवाशांकडून या अधिकार्यांनी कोट्यवधी रुपयांचे हिरे, सोने आणि महागडे घड्याळ जप्त केले आहे.
विदेशात होणार्या गोल्ड तस्करीला रोखण्यासाठी कस्टम अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. विशेषता दुबईसह इतर आखाती देशातून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची या अधिकार्यांकडून तपासणी केली जाते. शुक्रवारी आणि शनिवारी सलग दोन दिवसांत तीन प्रकरणात या अधिकार्यांनी तीन प्रवाशांना ताब्यात घेतले होते. या तिघांकडून २ किलो २८६ किलो सोने, १ कोटी ५४ लाख रुपयांचे हिरे आणि रोलेक्स घड्याळ आदी मुद्देमाल जप्त केला होता. दुबईहून आलेल्या एका प्रवाशाला सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून या अधिकार्यांनी बारा गोल्ड बार जप्त केले होते. त्याची किंमत सुमारे ९७ लाख रुपये इतकी होती. त्याने ते गोल्ड बार त्याच्या पॅण्टच्या पट्ट्यात लपवून आणले होते. ते गोल्ड त्याला विमानात प्रवास करणार्या एका प्रवाशाने दिले होते. त्यामुळे या प्रवाशाला नंतर या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
दुसर्या घटनेत अन्य एका प्रवाशाला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. हा प्रवासी हॉंगकॉंगहून शनिवारी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्याकडील सामानासह अंगझडतीत या अधिकार्यांना ६१ लाख ३८ हजाराचे एक सोन्याचा कडा, १३ लाख ७० हजार रुपयांचा एक रोलेक्स घड्याळ आणि कट पॉलिश केलेले हिरे असा १ कोटी ५४ लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला. त्याने हिरे बनियाच्या आतमध्ये एक विशिष्ठ पोकळी करुन लपवून ठेवले होते. तस्करीप्रकरणी या तिन्ही प्रवाशांना नंतर या अधिकार्यांनी अटक केली होती. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.