मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – बँकॉक आणि मस्तकहून आणलेल्या हायड्रोपोनिक गांजासह गोल्ड तस्करीचा सीमा शुल्क विभागाने पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत दोन प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर या अधिकार्यांनी अटक केली. या कारवाईत या अधिकार्यांनी दहा कोटीच्या हायड्रोपोनिक गांजासह साडेतेवीस लाखांचे गोल्ड जप्त केले आहेत. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस आणि गोल्ड तस्करीप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रग्ज आणि गोल्ड तस्करीचे प्रमाण वाढल्यानंतर सीमा शुल्क विभागाने अशा प्रवाशांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. रविवारी बँकाँकहून आलेल्या एका प्रवाशाला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या सामानाची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांना 10 किलो 509 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा सापडला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे दहा कोटी रुपये इतकी आहे. या प्रवाशाने चेक-इन-ट्रॉली बॅगेत हा गांजा लपवून आणला होता. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला या अधिकार्यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दुसर्या कारवाईत अन्य एका प्रवाशाला सीमा शुल्क विभागाने गोल्ड तस्करीच्या गुन्ह्यांत अटक केली. हा प्रवाशी रविवारी मस्तकहून छत्रपती शिवाजी आंतराष्ट्रीय विमानतळावर आला हातेा. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यावेळी त्याच्या अंगझडतीत या अधिकार्यांनी 24 केटी कच्चे सोने साखळी आणि सोन्याचा कडा सापडला. त्याची किंमत साडेतेवीस लाख रुपये इतकी आहे. ते सोने त्याने अंगावर लपवून आणले होते. गोल्ड तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.