बॅकाँकहून आणलेल्या हायड्रोपोनिक गांजा तस्करीचा पर्दाफाश
तीस कोटीच्या गांजासह दोन महिलांसह पाचजणांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 एपिल 2025
मुंबई, – बँकॉकहून आणलेल्या हायड्रोपोनिक गांजा तस्करीचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत पाच प्रवाशांना अटक करण्यात आली असून त्यात दोन महिलांचा समावेश आहेत. लक्ष्मण महाडिक, हर्षा छेडा, नूरमोहम्मद बिलाखिया, आफरीन नूरमोहम्मद बिलाखिया आणि मोहम्मद शफीक शेख अशी या पाचजणांची नावे आहेत. त्यांच्याकडून 29 किलो 520 ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा जप्त केला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे तीस कोटी इतकी किंमत आहेत. या पाचही आरोपीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून ते सर्वजण टुरिस्ट व्हिसावर पर्यटक म्हणून बँकाँकला गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
गेल्या काही वर्षांत विदेशातून गोल्ड आणि ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्याने कस्टम अधिकार्यांनी अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना बॅकाँकहून काही प्रवासी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती कस्टम अधिकार्यांना मिळाली होती. बँकाँकहून येणार्या प्रत्येक संशयिताची चौकशीसह त्यांच्या सामानाची तपासणी घेण्यात आली होती. ही मोहीम सुरु असताना नूरमोहम्मद आणि आफरीन या पती-पत्नींना या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या बॅगेतून या अधिकार्यांनी 11 किलो 808 ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला होता. अशाच दुसर्या कारवाईत या अधिकार्यांनी लक्ष्मण आणि हर्षा या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या सामानातून 11 किलो 808 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत सुमारे 24 कोटी रुपये इतकी आहेत.
या दोन्ही कारवाईनंतर या अधिकार्यांनी मोहम्मद शफीक याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सहा कोटीचा गांजाचा साठा जप्त केला आहे. त्याच्या सामानातून या अधिकार्यांनी 5 किलो 904 ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा जप्त केला. या तिन्ही कारवाईत या अधिकार्यांनी दोन महिलांसह पाच प्रवााशांना अटक केली. त्यात सुमारे 30 कोटी रुपयांचा 29 किलो 520 ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. यातील बिलाखिया पती-पत्नी भायखळा, लक्ष्मण जेकब सर्कल, हर्षा नालासोपारा तर मोहम्मद शफीक हा ट्रॉम्बे परिसरात राहत असल्याचे उघडकीस आले.
काही दिवसांपूर्वीच ते सर्वजण बँकाँकला गेले होते. टुरिस्ट व्हिसावर पर्यटक म्हणून गेल्यानंतर ते तेथून गांजा घेऊन आले होते. मुंबईत आल्यांनतर त्यांना हा गांजा एका व्यक्तीला देण्यास सांगण्यात आले होते. त्यासाठी त्यांना विमानाचे तिकिटासह काही रक्कमेचे कमिशनचे आमिष दाखविण्यात आले होते. कोणाला संशय येऊ नये म्हणून ते सर्वजण वेगवेगळ्या विमानाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विमानतळावर आले होते. मात्र ठराविक कमिशनच्या नादात त्यांना जेलची हवा खावी लागली आहे. ड्रग्ज तस्करीचा आरोप सिद्ध झाल्यास त्यांना किमान पंधरा ते वीस वर्षांचा कारावास होण्याची शक्यता आहे.